Monday, September 7, 2026

Dadar Best Bus News: भररस्त्यात बस ड्रायव्हरच्या कानशि‍लात देणाऱ्याविरोधात तक्रार, मुंबई पोलीस काय ॲक्शन घेणार?

Dadar Best Bus News: भररस्त्यात बस ड्रायव्हरच्या कानशि‍लात देणाऱ्याविरोधात तक्रार, मुंबई पोलीस काय ॲक्शन घेणार?

मुंबई: मुंबईमध्ये बस चालकाने कार चालकाला रस्ता न दिल्यामुळे मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली (Mumbai News). मुंबईच्या दादारमधील टिळक पुलाजवळची ही घटना असून बेस्ट प्रशासनाने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. रस्ता न दिल्यामुळे मागून येणाऱ्या संतप्त कार चालकाने बेस्टच्या कंत्राटी बस चालकाला मारहाण केली होती. नागरिकांनी मध्यस्थी करून बस चालकाची मारहाणीतून सुटका केली. त्यानंतर बेस्ट बस चालकाने दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाऊन कार चालकाविरोधात तक्रार केली. त्याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.

बेस्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा आगाराची मातेश्वरी कंत्राट दाराची (BEST Bus) बस क्रमांक सी ४० वरील बस रविवारी प्रबोधनकार ठाकरे उद्यान शिवडी बस स्थानकावरून दिंडोशी बस स्थानक कडे जात होती. ही बस दादर टिळक पुलाजवळ येताच बस चालकाने रस्ता न दिल्यामुळे मागून येणाऱ्या एका संतप्त कार चालकाने बसला ओव्हरटेक करून आपली कार भर रस्त्यात बससमोर थांबवली. (Road Traffic News)

बस चालकाला बस मध्ये चढून शिवीगाळ करत मारहाण केल्याचे कंत्राटी बेस्ट चालकाचे म्हणणे आहे. या मारहाणीनंतर कंत्राटी बस चालकाने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाऊन कार चालका विरोधात तक्रार केली आहे. दरम्यान, या कारवाई आणि तपासासाठी पोलिसांनी सोमवारी बस चालकाला अधिक चौकशीसाठी बोलविले होते. त्याचा तपास सुरू आहे.

घटना कशी घडली ? रविवारी (६ सप्टेंबर) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दादरच्या व्यस्त टिळक पुलाजवळ प्रचंड ट्रॅफिक जाम असल्यामुळे बस तिथेच अडकली होती. यादरम्यान मागून येणार्‍या एका कार चालकाला बसने वाट दिली नाही, या कारणावरून कार चालक प्रचंड संतापला. त्याने आपली कार पुढे नेऊन थेट बसच्या समोर उभी केली आणि रागाच्या भरात बसमध्ये शिरून चालकाला जाब विचारत मारहाण केली. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, बस चालकाच्या आसनाजवळ तीन तरुण उभे आहेत. त्यातील एकाने चालकाला कानशिलात लगावली, तर दुसऱ्याने त्याला गंभीर धमक्या दिल्या. यावेळी बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे,

">चालकाला मारहाण सुरू असताना बसमधील एकाही प्रवाशाने त्याला वाचवण्यासाठी किंवा मध्यस्थी करण्यासाठी पुढे न येणे आश्चर्यकारक होते. बसचा कंडक्टर सुरुवातीला शांत उभा होता, पण नंतर त्याने त्या लोकांना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर ते तिघेही जण बसमधून खाली उतरून निघून गेले. (Viral video)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >