Pune Crime : पुण्यात मध्यरात्री थरार! ४ ते ५ जणांनी घेरलं अन्...; सातारा महामार्गावर भयंकर हत्याकांड


पुणे : पुणे-सातारा महामार्गाजवळ भोर तालुक्यात रविवारी पहाटेच्या सुमारास हत्येची एक थरारक घटना घडली आहे. ४ ते ५ जणांच्या टोळक्याने एका २८ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याची निर्घृण हत्या केली. सागर रामचंद्र पालवे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे भोर परिसर आणि सिंहगड रस्त्यावरील रांजे गावामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune News)




गाढ झोपेत असताना अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला



ही घटना कोंढणपूर फाटा ते सिंहगड रस्त्यावरील रांजे गावच्या हद्दीत रविवारी पहाटे ३ वाजता घडली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास अचानक हवेत गोळीबार झाल्याचा मोठा आवाज आला. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता सागर पालवे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाची चक्रे फिरवली. (Pune Crime News)




आर्थिक वादातून हत्या



प्राथमिक तपासात हा खून आर्थिक व्यवहारातील वादातून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून इतर फरार आरोपींचा कसून शोध सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक केतन मचले आणि सागर कोंढाळकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. (Pune Murder News)

दरम्यान, पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातही पूर्ववैमनस्यातून एका २० वर्षीय तरुणावर गोळीबार झाल्याची दुसरी घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून पाच जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Pune Shooting News)

Comments
Add Comment

विद्याविहार, शीव आणि गोरेगावमधील वाहतूक कोंडी फुटणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण; ‘५९ मिनिटांत मुंबई’चे उद्दिष्ट दृष्टिपथात

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या वेगवान विकासामुळे ‘५९ मिनिटांत मुंबई’ हे उद्दिष्ट साध्य

Devendra Fadnavis : वाढवण बंदरानजीक रासायनिक उद्योगांचे मोठे केंद्र उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : जागतिक रासायनिक उत्पादन क्षेत्रात भारताला महत्त्वाचे स्थान मिळविण्याची संधी असून, संशोधन, आधुनिक

द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची अनमोल भेट; काय आहे पैठणीचं वैशिष्ट्य?

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना, काल (२१ ऑक्टोबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

Vehicle Registrations: वाहन खरेदीलाही दुष्काळाचा फटका; पुणे आघाडीवर, मुंबईत किती वाहनांची नोंदणी किती?

मुंबई: साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या दसरा सण अलीकडेच महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात साजरा केला. दसरा सणाच्या

पूर्व महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना; पायाभूत प्रकल्पांसाठी 6.17 कोटी मेट्रिक टन राखेच्या वापराचा ऐतिहासिक सामंजस्य करार

मुंबई : राज्यातील पर्यावरण संवर्धनाला हातभार लावत पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण

एसटी बसस्थानकं चकाचक ठेवण्याची जबाबदारी विभाग नियंत्रकांचीच; अस्वच्छतेवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा स्पष्ट इशारा

मुंबई: एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांना