Subhash Chandra : सीबीआयने एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्र (Essel Group Chairman Subhash Chandra) आणि इतर काही जणांविरोधात १,३२२ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड म्हणजेच एलआयसीएचएफएलची (LICHFL) ही फसवणूक २०१८ ते २०२६ दरम्यान करण्यात आल्याचा आरोप आहे. एलआयसीएचएफएलने दिलेल्या तक्रारीनुसार, सुभाष चंद्र यांनी कर्ज मिळवण्यासाठी स्वतःच्या मालमत्तेची खोटी माहिती देणारे प्रमाणपत्र सादर केले होते.
९८० कोटी रुपयांची दोन कर्जे मंजूर
एलआयसीएचएफएलने चार वेगवेगळ्या कंपन्यांना एकूण ९८० कोटी रुपयांची दोन कर्जे मंजूर केली होती. यामध्ये वसंत सागर प्रॉपर्टीज, पॅन इंडिया इन्फ्राप्रोजेक्ट्स, डिजिटल सबस्क्राइबर मॅनेजमेंट आणि स्पिरिट इन्फ्रापॉवर या कंपन्यांचा समावेश होता. या दोन्ही कर्ज सुविधांसाठी सुभाष चंद्र यांनी वैयक्तिक हमी दिली होती. मार्च २०१८ मधील एका प्रमाणपत्रात त्यांची निव्वळ संपत्ती सुमारे ५९,११३ कोटी रुपये असल्याचे दाखवण्यात आले होते आणि याच आधारे ही कर्जे मंजूर झाली होती.
Horrific cargo plane crash : मियामी विमानतळावर ॲमेझॉनच्या कार्गो विमानाचा भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू
Horrific cargo plane crash : अमेरिकेतील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ॲमेझॉनच्या प्राईम एअर नेटवर्कसाठी (Amazon's Prime Air network) कार्यरत असलेल्या बोईंग मालवाहू विमानाचा भीषण ...
मात्र, नंतर झालेल्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेदरम्यान सुभाष चंद्र यांनी एवढी संपत्ती असल्याचे नाकारले. २०२४ मध्ये आपली संपत्ती केवळ ३१.७९ कोटी रुपये होती आणि २०१७-१८ मध्ये ती ४०,००० कोटींपेक्षा जास्त नव्हती, असा दावा त्यांनी केला. सध्या वसंत सागर सुविधेचे ५७०.५० कोटी रुपये आणि डिजिटल सबस्क्राइबर सुविधेचे ५०७.२५ कोटी रुपये थकीत आहेत.
एलआयसीएचएफएलने आरोप केला आहे की, सुभाष चंद्र यांनी कर्जदार कंपन्या आणि त्यांच्या संचालकांशी संगनमत करून बनावट कागदपत्रे सादर केली आणि निधी मिळवला. यानंतर या पैशांचा गैरवापर करण्यात आला आणि वसुली टाळण्यासाठी मालमत्ता हलवण्यात आल्या. या गंभीर आरोपानंतर आता सीबीआयने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. (CBI)






