MPSC Paper Leak : 'विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारणाचा प्रयत्न'; MPSCच्या मुद्द्यावर नवनाथ बन यांचा विरोधकांवर निशाणा

मुंबई : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सध्या सुरू असलेल्या राजकारणावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी विरोधकांवर टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (MPSC Paper Leak)


महाविकास आघाडी सरकारच्या काळात पेपरफुटीच्या घटना घडल्या, त्यावेळी विरोधी पक्षातील काही नेत्यांनी भूमिका घेतली नाही, असा दावा बन यांनी केला. रोहित पवार यांचे एमपीएससी विद्यार्थ्यांवरील प्रेम केवळ राजकीय असल्याची टीकाही त्यांनी केली. विद्यार्थ्यांना खरोखर मदत करायची असेल तर त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले, याची माहिती जाहीर करावी, असे आव्हान त्यांनी दिले.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. तसेच सारथी आणि बार्टीसारख्या योजनांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध सुविधा देण्याची भूमिका सरकारने घेतल्याचे बन यांनी सांगितले.


एमपीएससी ही स्वायत्त संस्था असून तिच्या कामकाजात सरकारचा थेट हस्तक्षेप नसतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून काही जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. ( Student Protest)


दरम्यान, गणेशोत्सवातील डीजे आणि मिरवणुकांवरूनही बन यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. हिंदूंच्या सणांमधील आवाजाबाबतच आक्षेप घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.


शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांच्यावरही बन यांनी टीका केली. सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असून शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा त्यांनी केला.

Comments
Add Comment

Abu Dhabi Flight : तांत्रिक बिघाडामुळे कोच्चीहून अबू धाबीकडे जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान माघारी

तिरुवनंतपुरम : कोच्चीहून अबू धाबीकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ५०

Nashik Rain Update : नाशिककरांनो, पुढचे काही दिवस पावसाचे ! मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याचा इशारा

Nashik Rain Update : नाशिक जिल्हा आणि परिसरात पावसाचा मुक्काम आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान

Trump viral post : ‘न्यू मेक्सिको’ आता ‘न्यू अमेरिका’? ट्रम्प यांच्या पोस्टने पुन्हा चर्चेला उधाण

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले आहेत.

Nashik : उन्नत नाशिक अभियानाचा ११ वा टप्पा, भोसला कॅम्पसमध्ये ‘कुंभ युवा संवाद’

Nashik : नाशिकला स्वच्छ, सुंदर, हरित व पर्यावरणपूरक बनविण्यासाठी सुरू असलेल्या ‘उन्नत नाशिक अभियान’अंतर्गत ‘मिशन

Breaking! दिशा सालियन प्रकरणात नवीन ट्विस्ट: सचिन वाजे माफीचा साक्षीदार? वकील निलेश ओझा यांचा खळबळजनक दावा

मुंबई :  दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू

Satya Niketan building collapse owner arrested : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! सत्य निकेतन दुर्घटनेतील फरार मालक हरिराम बन्सलला राजस्थानमध्ये अटक

नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन भागात (Satya Niketan Building Collaps) ५ मजली इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी दिल्ली