Old Monk : 'ओल्ड मॉन्क' बाबत मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात आता ...

Old Monk :ओल्ड मॉन्क’ रमच्या विक्रीवरून सुरू असलेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) कंपनीला मोठा धक्का दिला आहे. ‘ओल्ड मॉन्क’ची निर्मिती करणाऱ्या मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर ब्रुअरीज प्रायव्हेट लिमिटेडला न्यायालयाने कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्रात ‘ओल्ड मॉन्क’च्या (Old Monk) विक्रीवर बंदी घालणाऱ्या FSSAIच्या आदेशाला कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.


या सुनावणीदरम्यान कंपनीचे ज्येष्ठ वकील नवरोज सीरवाई (Senior Advocate Navroz Seerwai)  यांनी न्यायालयासमोर तीन सुधारित उत्पादन लेबल्स सादर केले. कंपनीने संभाव्य तोडगा काढण्याच्या आपल्या हक्कांचा त्याग न करता हे लेबल्स सादर केल्याचं स्पष्ट केलं. दोन्ही पक्षांनी हे बदल स्वीकारल्यास कंपनी त्यानुसार लेबलमध्ये बदल करण्यास तयार आहे. मात्र, विरोध झाल्यास हे बदल मागे घेण्याचा अधिकार कंपनीने राखून ठेवला आहे. दरम्यान, केंद्र सरकार आणि FSSAIच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी या सुधारित लेबल्सवर सूचना देण्यासाठी न्यायालयाकडे (Bombay High Court) वेळ मागितला.



कंपनीची नेमकी मागणी काय होती ?


कंपनीने FSSAI च्या आदेशाला स्थगिती देण्याची आणि खटल्याच्या अंतिम सुनावणीपर्यंत आपली रम विकण्याची परवानगी मागितली होती. उच्च न्यायालयाने (Bombay High Court) म्हटले की, या टप्प्यावर असा अंतरिम आदेश देणे हे अंतिम दिलासा देण्यासारखेच होईल. न्यायालयाने हेही नमूद केले की, दोन्ही पक्ष खटल्याच्या अंतिम तोडग्याबाबत आधीच सविस्तर युक्तिवाद सादर करत होते. न्यायालयाने म्हटले की, अशा परिस्थितीत, कंपनीला अंतरिम टप्प्यावर विक्री सुरू ठेवण्याची परवानगी देणे योग्य ठरणार नाही.



‘ओल्ड मॉन्क’वर कारवाई का झाली ?


रायगड जिल्ह्यातील खोपोली (Khopoli) येथील कंपनीच्या उत्पादन प्रकल्पाची तपासणी केल्यानंतर FSSAIने ही कारवाई केली. FSSAIच्या म्हणण्यानुसार, उत्पादनामध्ये बाहेरून रमचा स्वाद वापरण्यात आला होता. मात्र, उत्पादनाच्या लेबलवर त्याचा स्पष्टपणे ‘फ्लेवर्ड रम’ असा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. याच कारणामुळे महाराष्ट्रात ‘ओल्ड मॉन्क’च्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ सप्टेंबर २०२६ रोजी Urgent Supplementary Board वर होणार आहे. तोपर्यंत ‘ओल्ड मॉन्क’च्या विक्रीला अंतरिम परवानगी देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

Comments
Add Comment

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री थरार! ४ ते ५ जणांनी घेरलं अन्...; सातारा महामार्गावर भयंकर हत्याकांड

पुणे : पुणे-सातारा महामार्गाजवळ भोर तालुक्यात रविवारी पहाटेच्या सुमारास हत्येची एक थरारक घटना घडली आहे. ४ ते ५

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मान्सून ओसरला, एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस गायब, शेतकऱ्यांची चिंता वाढली

मुंबई : एल निनोच्या प्रभावामुळे ( El Nino Effect) महाराष्ट्रात मान्सूनचा जोर ओसरल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : आपत्ती पुनर्प्राप्ती डेटा सेंटरची कामे, निर्धारित कालावधीत पूर्ण करावी; मंत्री आशिष शेलार यांनी दिले निर्देश

नागपूर : शासनाच्या विविध विभागांच्या माहितीची सुरक्षितता, उपलब्धता आणि विश्वासार्हता सांभाळण्यासाठी नागपूर

Ganpati Special Trains 2026 : गणपतीसाठी गावी जाताय? मग रेल्वेची ही बातमी नक्की वाचा! कोकणात जाणाऱ्यांसाठी ३४ विशेष गाड्या

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अत्यंत

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या नावाने फेक मेसेज व्हायरल; कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी हे वाचा!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सोशल मीडियावर एक मेसेज सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Kalyan Latur Expressway : कल्याण ते लातूर आता अवघ्या ४ तासांत; ३५ हजार कोटींच्या ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेला मंजुरी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्याला थेट जोडणाऱ्या कल्याण-लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला राज्य सरकारने