मुंबई : दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ कोस्टल रोडच्या दक्षिण वाहिनीवर (Southbound Stretch) अतिवेगाने आणि धोकादायकपणे कार चालवणाऱ्या ६ ते ७ चालकांविरोधात मरीन ड्राईव्ह (Marin Drive) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेगातील या गाड्यांमुळे इतर वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने पोलिसांनी ही कायदेशीर कारवाई केली आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई
पणजी (गोवा)/मुंबई : शिवसेना प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरमधील एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांसोबत होणाऱ्या गैरवर्तनाची गंभीर दखल ...
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ३ सप्टेंबर रोजी रात्री ११:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. मरीन ड्राईव्हच्या मुख्य रस्त्यावर हिरव्या, लाल, पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या काही महागड्या कार अत्यंत वेगात पळवल्या जात होत्या. या संपूर्ण कार रेसिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे गाड्या सुसाट वेगाने चालवल्या जात होत्या, ते पाहून सर्वसामान्य वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या वाहनांची ओळख पटवली असून पुढील कारवाई सुरू केली आहे.
पोलीस अंमलदाराच्या तक्रारीवरून एफआयआर (FIR) दाखल
या प्रकरणी ४ सप्टेंबर रोजी रात्री १०:५५ वाजण्याच्या सुमारास मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ४२ वर्षीय पोलीस अंमलदार सतीश निवृत्ती सांगळे यांच्या तक्रारीवरून अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
विविध कलमांखाली गुन्हा दाखल; आरोपींचा शोध सुरू
मरीन ड्राईव्ह पोलिसांनी निष्काळजीपणा आणि अतिवेगाने वाहन चालवून इतरांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी अज्ञात चालकांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम २८१, १२५ आणि मोटर वाहन कायद्याच्या (Motor Vehicles Act) कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या परिसरातील CCTV फुटेज तपासून या चालकांचा आणि त्यांच्या गाड्यांचा कसून शोध घेत आहेत.