Monday, September 7, 2026

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागणार? हवामान विभागाकडून ८ सप्टेंबरला मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागणार? हवामान विभागाकडून ८ सप्टेंबरला मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अपेक्षित जोर धरलेला नाही. अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने पिकांवर त्याचा थेट परिणाम झाला असून, काही ठिकाणी पाण्याअभावी पिके करपण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजाच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या असून, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. (Maharashtra Rain Forecast)

दरम्यान, शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासा देणारा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ८ सप्टेंबर रोजी राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही तासांत आणि दिवसांत पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोकण विभागात ८ सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या भागांत कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. (Maharashtra Rain Forecast)

उत्तर महाराष्ट्रातही हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. (Maharashtra Rain Forecast)

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. काही भागात उष्णता वाढण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. या भागांत देखील कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. (Maharashtra Rain Forecast)

विदर्भात कुठलीही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली नाही. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली नाही. काही भागात उष्णता वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rain Forecast)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >