Radha Patil : राधा पाटील अडचणीत! दहीहंडीच्या कार्यक्रमात नाचली, पण...; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

पुणे : पुण्यात परवानगी न घेता दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी प्रसिद्ध नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये संबंधित मंडळाचे अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे आणि कार्यक्रमाचे आयोजक अमोल काटे यांचाही समावेश आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय कार्यक्रम घेण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. (Radha Patil)



प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अडचणीत


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका दहीहंडी ( Dahi Handi ) उत्सवात विविध कलाकारांच्या नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात अश्लील किंवा आक्षेपार्ह नृत्यप्रकार सादर होऊ नयेत, यासाठी सहभागी कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे आवश्यक प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, आयोजकांकडून ही अट पूर्ण करण्यात आली नाही.



तिघांवर गुन्हा दाखल


आवश्यक प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे पोलिसांनी संबंधित दहीहंडी कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. असे असतानाही कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी कारवाई करत राधा पाटील, एम्पायर ग्रुप ए के बॉइजचे अध्यक्ष भूषण सोनवणे आणि आयोजक अमोल काटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.


राधा पाटील या महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगणा असून त्यांच्या नृत्याच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असते. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. (Dancer Radha Patil)


दरम्यान, दहीहंडी आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पोलिसांकडून आवश्यक परवानग्या घेणे गरजेचे असते. तसेच कार्यक्रमात सादर होणाऱ्या कलाप्रकारांसंदर्भात पोलिसांनी घातलेल्या नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे. परवानगी नाकारल्यानंतरही कार्यक्रम घेण्यात आल्याने आयोजकांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत. (Pune Police)


Comments
Add Comment

Pune Water Cut: ऐन पावसाळ्यात पुणेकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार, कोणकोणत्या भागांना बसणार फटका

पुणे: पुणेकरांना ऐन पावसाळ्यामध्ये पाणी टंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवसच

Police Constable Attack : पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोलिसावर कोयत्याने हल्ला; गांजा सेवन करणाऱ्या टोळक्याचा धक्कादायक प्रकार

पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिस शिपायावर कोयत्याने हल्ला (Koyta Attack)  झाल्याची धक्कादायक

Jalgaon : पावसाने पाठ फिरवताच कपाशीवर ‘लाल्या’चं संकट ! उत्पादन घटण्याची भीती, जळगावच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली

Jalgaon : यंदाच्या खरीप हंगामात कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. सुरुवातीला पावसाने दडी

सॉफ्टवेअर सोर्स कोड चोरीप्रकरणी मोठी कारवाई! दुबईत पसार झालेला संशयित पुणे विमानतळावर अटकेत

Action taken in software source code theft case : पुण्यातील आयटी कंपनीच्या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड चोरी केल्याच्या प्रकरणात अहिल्यानगर सायबर

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरचे ‘सेकंड ड्रीम होम’ ? 'या' ठिकाणी खरेदी केली कोट्यवधींची जमीन

Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता लोणावळ्यात आपलं ‘सेकंड ड्रीम होम’

Maharashtra Weather : उकाड्यापासून मिळणार दिलासा! 'या' जिल्ह्यांवर पावसाचे ढग; हवामान विभागाचा महत्त्वाचा अपडेट

मुंबई : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही