Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरचे ‘सेकंड ड्रीम होम’ ? 'या' ठिकाणी खरेदी केली कोट्यवधींची जमीन

Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता लोणावळ्यात आपलं ‘सेकंड ड्रीम होम’ उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. सचिनने पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध हिल स्टेशन असलेल्या लोणावळ्यात तब्बल 3.86 एकर जमीन खरेदी केली आहे. या जमिनीची एकूण किंमत जवळपास 70 कोटी रुपये असल्याचं समोर आलं आहे. ४ सप्टेंबर २०२६ रोजी हा जमीन व्यवहार झाल्याचं Zapkey च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.



तीन वेगवेगळ्या जमिनींची खरेदी


समोर आलेल्या माहितीनुसार, सचिन तेंडुलकरने लोणावळ्यात तीन वेगवेगळ्या जमिनीचे तुकडे खरेदी केले आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोणावळा येथे त्याने एकूण 15,601.78 चौरस मीटर जमीन खरेदी केली आहे. यातील सर्वात मोठा म्हणजेच 3.09 एकरचा भूखंड खरेदी करण्यासाठी सचिनने तब्बल 63.69 कोटी रुपये मोजले आहेत. तर दुसऱ्या जमिनीचा व्यवहार 4.56 कोटी रुपये, आणि तिसऱ्या जमिनीचा व्यवहार 1.75 कोटी रुपये इतका आहे


या व्यवहारातील 3.09 एकर जमीन ही सचिन तेंडुलकरच्या पूर्ण मालकीची असल्याची माहिती आहे. तर उर्वरित दोन जमिनींमध्ये सचिनची 50 टक्के भागीदारी असल्याचं समोर आलं आहे. या तीनही जमिनी नंदन मेहता आणि विवस्वत मेहता यांच्याकडून खरेदी करण्यात आल्या आहेत.या कोट्यवधींच्या व्यवहारासाठी सचिनने मोठी स्टॅम्प ड्युटीही भरली आहे. तिन्ही जमीन व्यवहारांसाठी तब्बल 4.20 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क, तर नोंदणी शुल्कापोटी 90 हजार रुपये भरल्याची माहिती आहे. Zapkey च्या माहितीनुसार, या व्यवहारामध्ये जमिनीचा दर प्रति चौरस मीटर सुमारे 4,168 रुपये असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.



लोणावळ्यात उभारणार आलिशान ड्रीम होम ?


दरम्यान, लोणावळा (Lonavala) हे पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेलं महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. थंड हवामान, हिरवाई आणि निसर्गरम्य वातावरणामुळे लोणावळ्यात वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात.


बॉलिवूड कलाकार, क्रिकेटपटू, उद्योगपती आणि अनेक बड्या व्यक्तींचे आलिशान बंगले लोणावळ्यात आहेत. त्यामुळे आता सचिन तेंडुलकरचं ड्रीम होमही याच लोणावळ्यात साकार होणार का? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, या जमीन व्यवहाराबाबत सचिन तेंडुलकर किंवा मूळ जमीन मालकांकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही.

Comments
Add Comment

Jalgaon : पावसाने पाठ फिरवताच कपाशीवर ‘लाल्या’चं संकट ! उत्पादन घटण्याची भीती, जळगावच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली

Jalgaon : यंदाच्या खरीप हंगामात कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. सुरुवातीला पावसाने दडी

सॉफ्टवेअर सोर्स कोड चोरीप्रकरणी मोठी कारवाई! दुबईत पसार झालेला संशयित पुणे विमानतळावर अटकेत

Action taken in software source code theft case : पुण्यातील आयटी कंपनीच्या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड चोरी केल्याच्या प्रकरणात अहिल्यानगर सायबर

Radha Patil : राधा पाटील अडचणीत! दहीहंडीच्या कार्यक्रमात नाचली, पण...; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

पुणे : पुण्यात परवानगी न घेता दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी प्रसिद्ध

Maharashtra Weather : उकाड्यापासून मिळणार दिलासा! 'या' जिल्ह्यांवर पावसाचे ढग; हवामान विभागाचा महत्त्वाचा अपडेट

मुंबई : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही

Maharashtra Private Coaching Centres Act 2026 : खासगी शिकवणी केंद्र नियमन कायद्याच्या मसुद्यावर नागरिकांना सूचना-हरकती नोंदविण्यास १५ सप्टेंबरपर्यंत संधी

मुंबई : महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६ च्या मसुद्याला राज्यभरातून मोठ्या

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागणार? हवामान विभागाकडून ८ सप्टेंबरला मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अपेक्षित जोर धरलेला नाही. अनेक भागांमध्ये पावसाने दडी