ठाणे: ठाणेकरांच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे. ठाणे शहरातील पहिल्या मेट्रो सेवेचा दुसऱ्यांदा ट्रायल रन घेण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच ठाणेकरांच्या सेवेमध्ये मेट्रो येणार असल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाणे आणि परिसरातील मेट्रोच्या कामांना वेग येताना पाहायला मिळत आहे. मेट्रो लाईन ४ वरील पहिल्या टप्प्याची ट्रायल रन दोन दिवसांपूर्वीच पार पडली आहे. ठाणे मेट्रोची ही दुसरी ट्रायल रन कासारवडवली ते नितीन कंपनी या स्थानकादरम्यान घेण्यात आली.
मुंबई : बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेली अभिनेत्री प्रीती झिंटा हिने राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘बटवारा १९४७’ या चित्रपटातून पुन्हा ...
ठाणे मेट्रोची दुसरी चाचणी दोन दिवसांपूर्वीच घेण्यात आली आहे. यापूर्वी कॅडबरी जंक्शनपर्यंत चाचणी घेण्यात आली होती. नुकत्याच घेण्यात आलेल्या ह्या चाचणीमुळे मेट्रोने मार्गावरील चाचणीचा आणखी एक टप्पा पूर्ण करण्यात आलेला आहे. मेट्रो अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो ४ मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. त्या आधी एमएमआरडीएकडून आणि राज्य सरकारकडून ट्रायल रन घेण्यात येत आहे. पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर ठाणेकरांची वाहतूक कोंडीच्या कटकटीतून लवकरच सुटका होणार आहे.
ठाणेकरांसाठी गुड न्यूज! मेट्रोची ट्रायल रन यशस्वी; पहिला टप्पा केव्हापासून सुरू होणार?
.
.#thanenews #MetroLine #Metro4 #prahaarnewsline #prahaarshorts pic.twitter.com/fVXuZuIzup
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) September 8, 2026
मेट्रो ४ मार्गिकेवरील १०.५ किमीच्या पहिल्या फेजचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. ट्रायल रनसाठी १० स्थानकांवरील काम अंतिम टप्प्यात आहे. कॅडबरी, माजीवाडा, कपूरबावडी, मानपाडा, टिकुजी-नी-वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासरवाडावली, गांवनिवाडा आणि गायमुख या १० स्थानकांवर दुसरी ट्रायल रन घेण्यात आली. या मेट्रो मार्गिकेचा वापर ठाणे आणि उपनगरातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी ऑफिसेस आहेत. त्यामुळे नोकरदारांसाठी सुद्धा ही मेट्रो फार सोयीस्कर होणार आहे. भविष्यात हा मार्ग मुंबईतील इतर मेट्रो मार्गांशी जोडण्यात येईल, असा एमएमआरडीएचा मानस आहे.