Kalyan News: कल्याण पूर्वेत दिवसाढवळ्या गणेशमूर्ती चोरीला, चोरट्याची करामत कॅमेऱ्यात कैद

कल्याण: कल्याण पूर्वेमध्ये भरदिवसा चोरट्याने दुकानातून गणपतीची मुर्ती चोरल्याची घटना घडली आहे. भरदिवसा दुकानातून गणपतीची मुर्ती चोरीला गेल्यामुळे सध्या परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. चोरट्याची करामत दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दुकानातील फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांकडून दिली जात आहे. (Kalyan News)



कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीतील एका भांड्यांच्या दुकानातून चोरट्याने गणपतीची मुर्ती लंपास केली आहे. सहज दुकानामध्ये येत, कोणालाही कसलाच मागोवा न देता चोरट्याने सुमारे १५ किलो वजनाची पितळेची गणपतीची मूर्ती चोरून नेली आहे. दुकानातील CCTV कॅमेऱ्यातील व्हिडिओमध्ये, परिसरातील एका भांड्यांच्या दुकानात नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू असताना चोरट्याने प्रवेश केला. दुकानातील कर्मचाऱ्यांचे किंवा चालकाचे लक्ष नसताना, चोरट्याने दुकानात ठेवलेली सुमारे १५ किलो वजनाची जड आणि मौल्यवान पितळेची गणेशमूर्ती अत्यंत सावधगिरीने उचलली आणि दुकानाबाहेर काढता पाय घेतला. (Viral Video)






​घटनेनंतर दुकानदाराने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक संशयित व्यक्ती दुकानात येऊन मूर्ती चोरताना व ती घेऊन बाहेर जाताना दिसून आली. चोरीची ही संपूर्ण दृश्ये फुटेजमध्ये दिसल्याने दुकानदाराने तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. ​सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी परिसरातील इतर फुटेज व तपासाच्या आधारे आरोपीचा लवकरात लवकर शोध घेतला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आगामी

">सणासुदीच्या काळात अशा प्रकारे भरदिवसा चोरी झाल्याने स्थानिक व्यापारी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. (Ganeshotsav 2026)

Comments
Add Comment

PM Modi Security Breach : पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बनावट PMO अधिकाऱ्याचा रुबाब; मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक

एकाकडे बंदूक आढळल्याने खळबळ मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' (NMACC) परिसरात

ASK Private Wealth Hurun India Cheetah Index : भारतातील 'चीता' स्टार्टअप्सची लाट! Hurun India रिपोर्टमध्ये ११० कंपन्यांची बाजी; बेंगळुरू ठरले नंबर १!

मुंबई : भारतातील वेगाने प्रगती करणाऱ्या आणि भविष्यात 'युनिकॉर्न' (Unicorn) बनण्याची क्षमता असलेल्या स्टार्टअप्सची नवी

Nitesh Rane on Aaditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणाशी संबंध नसेल तर आदित्य ठाकरेंनी हस्तक्षेप याचिका का दाखल केली ? मंत्री नितेश राणे यांचा सवाल

तत्कालीन महापौरांनी दिशाच्या आईवडिलांना धमक्या दिल्या मुंबई : दिशा सालियन (Disha Saliyan) मृत्यू प्रकरणाशी जर आदित्य

Nitesh Rane : गरब्यात मुस्लिमांना ‘नो-एन्ट्री’ - मंत्री नितेश राणे यांची भूमिका

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी प्रवेशासाठी आधारकार्ड अनिवार्य असावे मुंबई : नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडिया

Maratha Reservation News : मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मध्यरात्री खलबते

- महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती; मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत झाली चर्चा मुंबई : मराठा आंदोलक मनोज

Jogeshwari Trauma Hospital : जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात खरेदी केलेली २५ कोटींची मशिन धुळखात

महापौर रितू तावडे यांनी या मशिनचा त्वरीत वापर करण्याचे दिले निर्देश महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये ही