Manoj Jarange News: मनोज जरांगे यांच्या १५ पैकी १२ मागण्या मान्य, सरकारकडून जरांगे यांना उपोषण स्थगित करण्याचे आवाहन

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या १५ मागण्यांपैकी १२ मागण्या सरकारने मान्य केल्या असून, त्यांच्या अंमलबजावणीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी दिली. मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यासाठी आढावा बैठका सुरू असून, काही प्रकरणांतील शंकांचेही निरसन करण्यात येत आहे. सरकारने प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केल्याने जरांगे यांनी आता उपोषण स्थगित करावे, असे आवाहन सामंत यांनी केले. (Manoj Jarange Patil)



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मान्य केलेल्या १२ मागण्यांच्या अंमलबजावणीचा मंगळवारी आढावा घेण्यात आला. आंदोलकांकडून सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत काही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. त्याचे निरसन करण्यासाठी मराठवाड्यातील सर्व उपविभागीय अधिकारी (एसडीएम) तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बुधवारी विशेष बैठक घेण्यात आली. मान्य मागण्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले. (Manoj Jarange Hunger Strike)

जात पडताळणीच्या कामाची माहिती देताना सामंत म्हणाले की, आतापर्यंत २१ हजार ५१ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १६ हजार ११० नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. २ हजार ३१४ प्रकरणे अद्याप प्रलंबित असून, ती तातडीने निकाली काढून पात्र नागरिकांना योग्य प्रमाणपत्रे देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. परभणीमध्ये १ हजार २७१ अर्जांपैकी ८२५ अर्ज वैध ठरले आहेत. तसेच ९० दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेले प्रकरण नसल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. बीडमध्ये १३ हजार ७७४ अर्जांपैकी ११ हजार ४३७ नागरिकांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. तर लातूरमध्ये अवैध अर्जांची संख्या शून्य असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra News)



वंशावळ सिद्ध न होणे, वंशावळीमध्ये पूर्ण नावाचा अभाव किंवा शालेय नोंदी उपलब्ध नसणे यांसारख्या कारणांमुळे काही प्रकरणे प्रलंबित असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले. न्यायालयीन कक्षेत येणाऱ्या प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रियेनुसारच निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे. (Uday Samant)

दरम्यान, मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या हक्कांवर कोणतीही गदा येणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जात असल्याचे सामंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार मराठा समाजाच्या मागण्यांवर कार्यवाही करीत आहे. त्यामुळे सरकारच्या या भूमिकेचा विचार करून मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करावे, अशी विनंती सामंत यांनी केली.

या बैठकीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. आमदार प्रसाद लाड, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्यासह संबंधित विभागांचे

">वरिष्ठ अधिकारी
बैठकीला उपस्थित होते.
Comments
Add Comment

Anna Bansode : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वास्तूंची जतन-संवर्धन कामे दर्जेदार करावीत; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले निर्देश

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई’ अंतर्गत शाळा,

Drishyam 3 : अक्षय खन्नाच्या जागी जयदीप अहलावत? 'दृश्यम ३' च्या ट्रेलर लाँचवेळी अभिनेत्याने सोडले मौन म्हणाला, मी अक्षय खन्नाची...

मुंबई : बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'दृश्यम ३' (Drishyam 3) ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अक्षय

Devendra Fadnavis : यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून, संभाव्य साखर टंचाई रोखण्यासाठी निर्णय; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य साखर टंचाई रोखण्यासाठी यंदाचा गाळप हंगाम लवकर सुरू करण्याबाबत

Ban on Dolby sound systems : धुळ्यात गणेश मंडळांना मोठा धक्का ! डॉल्बी आणि लेझर लाईटवर थेट बंदी, उल्लंघन केल्यास गुन्हा

Ban on Dolby sound systems : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाची तयारी सुरू असतानाच धुळे जिल्हा पोलिसांनी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय

Navnath Ban : हिंदुत्वाचे शिवधनुष्य पेलण्याची संजय राऊतांची औकात नाही; भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई : जनाब संजय राऊत, हिंदुत्वाचे शिवधनुष्य तुम्हाला पेलवणार नाही. तुम्ही आता औरंगजेब फॅन क्लब चालवणाऱ्या

Pratap Sarnaik : चालकांना कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व; ॲपआधारित टॅक्सी चालकांची संपूर्ण माहिती तीन महिन्यांत सादर करा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : ‘महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या