पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक सारख्या महत्त्वाच्या शहरांत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांतून तरूण स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी येत असतात. ग्रामीण भागांतून पुण्यामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या होतकरू तरुणाने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव प्रथमेश देशमुख असं आहे.
गणेशोत्सव २०२६ : गणेश विसर्जनाच्या दिवशी ठाण्यात अवजड वाहनांना बंदी; वाहतूक पोलिसांकडून नियमावली जाहीर
गणेशोत्सव २०२६ दरम्यान विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पडाव्यात आणि शहरातील वाहतूक कोंडी टाळावी, यासाठी ठाणे शहर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. ...
पुण्याच्या नारायण पेठ परिसरामध्ये राज्यसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या २५ वर्षीय तरुणाने सुसाईड नोट लिहित आपले जीवन संपवले आहे. प्रथमेश दिलीप देशमुख (मूळ रा. खासापुरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे या तरुणाचं नाव असून, तो गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पुण्यामध्ये राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. प्रथमेशने सततची आर्थिक टंचाई आणि डोक्यावर झालेला कर्जाचा भार यामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरूणाने आत्महत्येचं कारण सुसाईड नोटमध्ये स्पष्ट केले आहे. प्रथमेशने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण स्पर्धा परीक्षा वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेशने सततची आर्थिक टंचाई आणि डोक्यावर झालेल्या कर्जाच्या भारामुळे नैराश्यात येत आपले जीवन संपवले. पुण्यातील राहत्या खोलीचे थकलेले भाडे देण्यासाठी, खाण्यापिण्याचा खर्च आणि अभ्यासाचा वाढता ताण यामुळे त्याने ओळखीच्या लोकांकडून उसनवारी घेतली होती. उसने पैसे घेऊन त्याच्यावर तब्बल अडीच लाख रुपयांचे कर्ज झाले होते. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याने स्पर्धा परीक्षा सोडून गावी परत जाण्याचा निर्णयही त्याने घेतला होता, हा निर्णय प्रथमेशने आपल्या जवळच्या मित्रांजवळही बोलून दाखवला होता. घटनास्थळावर पोलिसांना त्याने लिहिलेली सुसाईड नोट सुद्धा मिळाली आहे.
Chandrakant Patil : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेशी संबंधित दुर्मिळ दस्तऐवजांचा नवीन खंड २० ऑक्टोबर रोजी होणार प्रकाशित
Mumbai : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे घेतलेल्या ऐतिहासिक बौद्ध धम्मदीक्षेशी संबंधित दुर्मिळ पत्रव्यवहार, कागदपत्रे आणि महत्त्वपूर्ण ...
सुसाईड नोटमध्ये त्याने ज्यांच्याकडून उसने पैसे घेतले होते, त्यांचं नाव आणि रक्कम सुद्धा नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून
&t=3s">सुसाईड नोटमधील मजकूराची तपासणी केली जात असून देशमुख कुटुंबीयांची, इतर नातेवाईकांची आणि ज्यांच्याकडून उधार पैसे घेतले आहेत, त्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे.