Wednesday, September 9, 2026

Justice Mahesh Chandra Tripathi : न्या. महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

Justice Mahesh Chandra Tripathi : न्या. महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी बुधवारी लोकभवन येथे झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभात अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ दिली. शपथ प्रदान केल्यानंतर राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन न्या. त्रिपाठी यांचे अभिनंदन केले.

यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती सचिन अहिर, मंत्री छगन भुजबळ, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायमूर्ती सुजाता मनोहर आणि न्यायमूर्ती मोहित शाह यांसह अनेक मान्यवर या समारंभास उपस्थित होते.

न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदी नियुक्ती झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्ती पद रिक्त झाले होते. न्यायमूर्ती रवींद्र घुगे हे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >