Eknath Shinde : ब्रिटिश संसदेत महाराष्ट्राचा गौरव; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तीन पुरस्कार

'हाऊस ऑफ कॉमन्स'मधील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘स्टेटस्मनशिप अवॉर्ड’


दोन दिवसीय दौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडनला रवाना


मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनातील कामाची आणि विविध लोककल्याणकारी योजनांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. ब्रिटनच्या संसदेत 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी शिंदे यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. या दोन दिवसीय लंडन दौऱ्यात त्यांचा तीन वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. (British Parliament)




9 सप्टेंबर रोजी हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ पुरस्काराने शिंदे यांचा गौरव होणार आहे. त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये होणाऱ्या ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह 2026’मध्ये त्यांना ‘स्टेटसमनशिप अवॉर्ड’ देण्यात येणार आहे. याशिवाय लंडनमधील महाराष्ट्र मंडळातर्फे त्यांना ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना शिंदे यांनी राबवलेल्या काही महत्त्वाच्या योजनांची या पुरस्कारासाठी विशेष दखल घेण्यात आली आहे. महिलांना आर्थिक मदत देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, नागरिकांना सरकारी सेवा त्यांच्या दारापर्यंत उपलब्ध करून देणारा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम आणि तरुणांना रोजगारासाठी प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणारी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ यांचा त्यात समावेश आहे. (Eknath Shinde)



10 सप्टेंबर रोजी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह 2026’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शिंदे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार असून महाराष्ट्राच्या विकासाचे धोरण, पायाभूत सुविधा, नगरविकास आणि गुंतवणुकीच्या संधी याबाबत ते आपले विचार मांडणार आहेत.


या दौऱ्यात ब्रिटिश संसद सदस्य, मंत्री, विविध देशांचे राजदूत, महापौर आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि ब्रिटनमधील व्यापार, उद्योग आणि गुंतवणूक संबंधांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Commanwealth Leadership)


दरम्यान, शिंदे महाराष्ट्र मंडळाच्या महाराष्ट्र भवनालाही भेट देणार आहेत. यावेळी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातील योगदानाबद्दल त्यांचा ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. (Maharashtra)

Comments
Add Comment

Premnagarcha Maharaja : मुंबईत पुन्हा घडली तीच दुर्दैवी घटना! कुर्ल्यात बाप्पाच्या आगमनावेळी नेमकं काय घडलं?

मुंबई : मुंबईत गणेशमूर्तीच्या अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे. कुर्ला पश्चिमेकडील शीतल तलाव परिसरात

Fake PMO officer arrested Mumbai : PMO बनावट आयडी आणि शस्त्रासह घुसणाऱ्या दोघांना अटक; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याशी संबंध नसल्याचा पोलिसांचा खुलासा

मुंबई : मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील 'नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात' (NMACC) सुरक्षेचा

FDA News: मुंबईमध्ये एफडीएची धडक कारवाई, रेल्वे प्रवाशांना अन्नपुरवठा करणाऱ्या कंपनीचा परवाना निलंबित

मुंबई: अन्न आणि औषध प्रशासनाकडून IRCTC अंतर्गत रेल्वे प्रवाशांना अन्न पुरवठा करणाऱ्या बेस किचन आणि फूड प्लाझाची

Mumbai Coastal Road Traffic: कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अपघात, वाहनांची भलीमोठी रांग; Video

मुंबई: कायमच सुसाट धावणाऱ्या कोस्टल रोडवर काही वेळापासून वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. काही

Kalyan News: कल्याण पूर्वेत दिवसाढवळ्या गणेशमूर्ती चोरीला, चोरट्याची करामत कॅमेऱ्यात कैद

कल्याण: कल्याण पूर्वेमध्ये भरदिवसा चोरट्याने दुकानातून गणपतीची मुर्ती चोरल्याची घटना घडली आहे. भरदिवसा

PM Modi Security Breach : पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बनावट PMO अधिकाऱ्याचा रुबाब; मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक

एकाकडे बंदूक आढळल्याने खळबळ मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' (NMACC) परिसरात