मुंबई: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असं असताना सध्या महाराष्ट्रामध्ये ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा प्रचंड गाजताना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या वेळी अनेक ठिकाणी डीजे आणि ढोल ताशाच्या गजरात जल्लोष मिरवणुका काढल्या जातात. याच मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारणही सध्या तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करत असताना आता अशातच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने माध्यमांसोबत संवाद साधताना डीजेबंदीवर प्रतिक्रिया दिली आहे. (Marathi Actor)
Mary Kom : ‘मी मेरीला घडवलं' म्हणणाऱ्यांना मेरी कॉमचं सडेतोड उत्तर; म्हणाली...
मुंबई : सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस २०’ सुरू होताच घरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. ६ सप्टेंबरला झालेल्या ग्रँड प्रीमियरनंतर अवघ्या ...
माध्यमांसोबत संवाद साधताना अभिनेता श्रेयस तळपदे म्हणाला की, " प्रत्येकाने सण साजरे करायलाच हवे, पण लोकांना त्रास व्हायला नको. सण वेगळ्या पद्धतीनेही साजरा करता येऊ शकतो. आपल्या सणांचे वेगळे वैशिष्ट्ये आणि गांभीर्य आहेत. ते सर्व समजून, कोणालाही त्रास न देता, लोकांनी आपले सण साजरा करायला हवेत." इतकंच नाही तर अभिनेत्याने मराठी भाषा सक्तीवरही प्रतिक्रिया दिली आहे. श्रेयस म्हणाला की, "मुंबईच नाही तर महाराष्ट्रात मराठी बोलायला काय प्रॉब्लेम आहे, मी अजून कुठे गेलो तर तिथली भाषा शिकतो, मी 'इकबाल'च्या शूटिंगवेळी हैदराबादला गेलो होतो तेव्हा थोडी- थोडी तेलगू शिकलो होतो, आपण जिथे राहतो, जिथे काम करतो तिथली भाषा शिकायला काय हरकत आहे." (Shreyas Talpade On DJ Ban)
Asha Bhosle : आशा भोसले यांच्या ९३व्या वाढदिवशी खास भेट; ए. आर. रहमान यांच्या ‘आशा फॉरएव्हर’ गीताचे लोकार्पण
मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले या आपल्या उत्साह, ऊर्जा आणि सदैव तरुण वाटणाऱ्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जात होत्या. नव्वदीच्या दशकातही मंचावर ...
अभिनेता श्रेयस तळपदेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, तो शेवटचा 'द इंडिया स्टोरी' आणि 'वेलकम टू द जंगल' या दोन चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'गोलमाल ५' चित्रपटातूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट आणि सिरीयलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनामनामध्ये श्रेयस पोहोचलेला आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर फक्त
">मराठी इंडस्ट्रीतच नाही तर, बॉलिवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीतही त्याने आपली छाप पाडली आहे. (Ganeshotsav 2026)