Pune Crime : वेशभूषा बदलली, सोशल मीडिया बंद केला पण 'ती' गोष्ट महागात पडली ; अखेर गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Pune Crime : पोलिसांना चकवा देण्यासाठी वेशभूषा बदलली, सोशल मीडियापासूनही स्वतःला दूर ठेवलं, तब्बल चार महिने पोलिसांच्या हातावर तुरी देत फिरत राहिला पण अखेर आईला भेटण्याचा मोह त्याला चांगलाच महागात पडला. आईला भेटण्यासाठी घरी येताच पोलिसांनी सापळा रचून अट्टल गांजा तस्कराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अजय पोपटराव पाडुळे (Ajay Popatrao Padule)असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.


भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) अजय पाडुळे आणि त्याचा साथीदार चारुदत्त चव्हाण यांच्याविरोधात गांजा तस्करीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान चारुदत्त चव्हाण याच्याकडून तब्बल ३५ किलो गांजा जप्त केला होता. मात्र, गुन्हा दाखल होताच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेला अजय पाडुळे पसार झाला.



पोलिसांना चकवा देण्यासाठी बदलली वेशभूषा


गुन्हा दाखल झाल्यानंतर पाडुळे शहरातून गायब झाला. मात्र, तो गुपचूप गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. पोलिसांपासून आपली ओळख लपवण्यासाठी त्याने वेशभूषा बदलली. एवढंच नाही तर पोलिसांना त्याचा डिजिटल माग काढता येऊ नये, यासाठी सोशल मीडिया अकाउंट्सचा वापरही बंद केला. त्यामुळे पाडुळे नेमका कुठे आहे, याचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं होतं.



आईला भेटायला आला अन् पोलिसांनी घेरलं


चार महिन्यांपासून फरार असलेल्या पाडुळेबाबत अखेर भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाला गुप्त माहिती मिळाली. अजय आपल्या आईला भेटण्यासाठी हडपसरमधील नवीन म्हाडा वसाहतीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात सापळा रचला. अजय तिथे पोहोचताच पोलिसांनी त्याला चोहोबाजूंनी घेरलं आणि पळून जाण्याची कोणतीही संधी न देता त्याच्या मुसक्या आवळल्या. चार महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अजय पाडुळेचा अखेर पोलिसांनी शोध घेतला. या कारवाईमुळे गांजा तस्करी करणाऱ्यांमध्येही खळबळ उडाली असून, या प्रकरणातील पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Apple Mega Event 2026 : आज रात्री iPhone 18 Pro आणि पहिल्या फोल्डेबल iPhone Duo वरून अखेर पडदा उठणार ?

कुपर्टिनो (कॅलिफोर्निया) येथील प्रसिद्ध 'स्टीव्ह जॉब्स थिएटर'मध्ये ॲपलच्या भव्य सोहळ्याची पूर्ण तयारी झाली आहे.

Shambhuraj Desai : एकेरी, शिवराळ भाषेमुळे जरांगेंच्या आंदोलनाची दिशा बदलली

- मंत्री शंभूराज देसाई; टीका करण्यापेक्षा सरकारशी चर्चा करण्याचे आवाहन मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी

'सण साजरे करायला पाहिजे, पण...', डीजे बंदीवर मराठमोळ्या अभिनेत्याचं रोखठोक उत्तर

मुंबई: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असं असताना सध्या महाराष्ट्रामध्ये ध्वनी प्रदूषणाचा

Fintech India : फिनटेकमध्ये भारताची प्रगती थक्क करणारी!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्राला ‘टोकनाइज्ड’ राज्य बनविण्याच्या दिशेने पुढची पायरी मुंबई : फिनटेक

Nashik : गणेशोत्सवाआधी नाशिकचे रस्ते होणार खड्डेमुक्त ! आयुक्तांचे विभागांना कडक आदेश

Nashik : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस बाकी आहे आणि याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. गणेश

DCM Eknath Shinde News: लंडनऐवजी झ्युरिकला विमान उतरले, हिथ्रो विमानतळावरील तांत्रिक बिघाडाचा एकनाथ शिंदेंच्या अधिकाऱ्यांना फटका

मुंबई: लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाचा फटका महाराष्ट्राचे