Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर; १३ आणि १४ सप्टेंबरला विविध कार्यक्रम

एशियाटिक सोसायटी, हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहणार


मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) १३ आणि १४ सप्टेंबरला मुंबईच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यात फोर्टमधील दि एशियाटिक सोसायटीला भेट तसेच वाशी येथे होणाऱ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला उपस्थिती लावणार आहेत. प्राच्यविद्या संशोधनाचा समृद्ध वारसा जपणाऱ्या एशियाटिक सोसायटीच्या भेटीत शाह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी आणि सदस्यांशी संवाद साधणार असून, दुर्मीळ पोथ्यांच्या प्रदर्शनालाही ते भेट देतील. त्यानंतर सोमवारी वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात होणाऱ्या सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात ते सहभागी होतील.



एशियाटिक सोसायटीला ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था’ असा विशेष दर्जा देण्याची मागणी गेल्या चार वर्षांपासून केंद्राकडे प्रलंबित आहे. शाह यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न मार्गी लागण्याच्या अपेक्षांना पुन्हा चालना मिळाली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून याबाबतही शाह यांच्यासमोर भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे. शाह यांच्या भेटीदरम्यान संस्थेतील दुर्मीळ पोथ्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. त्यात पाच खंडांमध्ये प्रसिद्ध झालेल्या पा. वा. काणे यांच्या ‘भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास’ या ग्रंथाचे संस्थेने जतन केलेले संदर्भसाहित्यही महत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय दंड संहितेच्या उगमाशी धर्मशास्त्राचा संबंध असल्याचे मानले जात असल्याने या साहित्याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, एशियाटिक सोसायटीची अलीकडील निवडणूकही चर्चेत आली होती. जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत ‘एशियाटिक टुमारो’ या गटाने विजय मिळवला आणि भाजपचे माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे अध्यक्ष झाले. त्यांच्या निमंत्रणानंतर शाह यांचा संस्थेचा दौरा निश्चित झाला आहे.


">शाह यांच्या मुंबई दौऱ्याचा दुसरा टप्पा वाशीतील हिंदी राजभाषा संमेलनाचा असेल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १४ सप्टेंबरपासून वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात सहावे अखिल भारतीय राजभाषा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन १४ आणि १५ सप्टेंबर असे दोन दिवस चालणार असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्याला प्रमुख उपस्थिती असेल. देशभरातील हिंदी भाषिक साहित्यिक, संस्था, अधिकारी आणि प्रतिनिधी या संमेलनात सहभागी होणार आहेत. केंद्र व राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि अधिकारीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव आणि गणपती विसर्जनाच्या काळातच हा कार्यक्रम होत असल्याने वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्राचा परिसर कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. दहा हजारांहून अधिक वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले असून, गर्दी आणि वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.

Tags
Home Minister Amit ShahMaharashtra politics newsAmit ShahBJP Maharashtramarathi news todayMumbai news MarathiAmit Shah Mumbai visitAmit Shah Maharashtra TourAsiatic Society MumbaiHindi Rajbhasha Sammelan Navi MumbaiAmit Shah Schedule MumbaiLatest Political Updates Marathi
Comments
Add Comment

Nitesh Rane : कोकणातील जलमार्गांना दिशा देण्यासाठी मंत्री नितेश राणेंकडून अभ्यास दौरा

गोव्यात जलवाहतुकीचा प्रत्यक्ष अनुभव; सिंधुदुर्गात जहाजबांधणी, दुरुस्ती उद्योगाच्या संधींचा अभ्यास मुंबई :

Draft Voter List : प्रारूप मतदार यादी आणि २०२४ च्या विधानसभा मतांची तुलना करणे चुकीचे; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा स्पष्ट खुलासा

Mumbai :

Navi Mumbai Airport: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास होणार अधिक स्वस्त; नेमकं कारण काय?

नवी मुंबई: विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. डिसेंबर २०२५ पासून सुरू

FDA action : अन्न व औषध प्रशासनाचा दणका! शिळ-दिवा परिसरातील २० लाखांचा अस्वच्छ अन्नसाठा जप्त; मुंबई-पुण्यातील नामवंत हॉटेल्सचे परवाने निलंबित

Mumbai : सणासुदीचा काळ जवळ येत असताना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध तीव्र मोहीम

MMRDA transfer : एमएमआरडीएच्या सामाजिक विकास शाखेत मोठा फेरबदल; १६ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या, अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी

Mumbai : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या सामाजिक विकास विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल

Mumbai Monorail : मुंबई मोनोरेलला पुन्हा ब्रेक! सुरक्षा जाळ्यांमुळे सेवा सुरू होण्यास आणखी विलंब?

Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची वाहतूक सेवा असलेली मोनोरेल पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा आणखी लांबण्याची