BMC : मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना मिळणार १ कोटींचा निधी?

नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची निधीचा ठराव सभागृहात मंजूर


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत नगरसेवकांना नगरसेवक स्वेच्छा निधीमध्ये वाढ करण्याच्या मागणी चा प्रस्ताव अखेर महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. सध्या नगरसेवकांना आपल्या प्रभागातील नागरी सेवा सुविधांची कामे करण्यासाठी ६० लाख रुपयांचा निधीची तरतूद केली जाते. परंतु हा ६० लाख रुपयांचा निधी वाढवून १ कोटी रुपये केला जावा अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. हा निधी वाढवून देण्याच्या ठरावाला महापालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली आहे. ( Mumbai Municipal Corporation)



भाजपच्या नगरसेविका अश्विनी मते यांनी महापालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी करताना, सध्या प्रत्येक नगरसेवकाला दरवर्षी ६० लाख रुपये एवढा नगरसेवक स्वेच्छा निधी उपलब्ध करुन दिला जातो. पण , प्रभागातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, सार्वजनिक प्रसाधनगृहे, उद्यान सुशोभीकरण तसेच अन्य तातडीच्या नागरी कामांसाठी उपलब्ध होणारा हा निधी अत्यंत अपुरा पडत आहे. वाढत्या महागाईमुळे साहित्याचे दर तसेच मजुरीच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, त्यामुळे ६० लाख रुपयांच्या मर्यादित निधीतून प्रभागातील अनेक महत्त्वाची विकासकामे पूर्ण करणे कठीण झाले आहे. त्यामुळे मुंबईकर नागरिकांना अधिकाधिक उत्तम नागरी सुविधा उपलब्ध नगरसेवक स्वेच्छा निधीची वार्षिक मर्यादा ६० लाख रुपयांवरुन वाढवून १ कोटी रुपये करण्यात यावी. जेणेकरून मुंबईकर नागरिकांना अधिकाधिक उत्तम नागरी सुविधा करून देणे शक्य होईल,असे मते यांनी नमुद केले आहे. ( Corporator Fund)


याबाबतचा ठरावाची सूचना महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आली आहे. याबाबतचा ठराव मंजूर करून महापौरांनी पुढील अभिप्रायकरता आयुक्तांकडे हा प्रस्ताव पाठवून दिला आहे.


मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात मोठी व आर्थिकदृष्टया संपन्न महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. त्यामुळे नगरसेवक निधीतून नागरिकांच्या अपेक्षेनुसार ही कामे जलदगतीने व दर्जेदार पध्दतीने पूर्ण करता ये नाही. अशाप्रकारे ही कामे करता यावी यासाठी नगरसेवकांना उपलब्ध करुन दिलेल्या नगरसेवक निधीच्या मर्यादेत वाढ करणे ही काळाची गरज असल्याचे अश्विनी मते यांनी म्हटले आहे. ( BMC General Body Meeting)

Comments
Add Comment

Ganeshotsav 2026 : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा; 11 सप्टेंबरपासून टोल पूर्णपणे माफ

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मोठा

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गणेशमूर्तीच्या वाहनाला टँकरची धडक; 4 जण जखमी

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी सकाळी गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनाला सिमेंटच्या टँकरने मागून

Mumbai Chicken Shops : मुंबईतील सर्व कोंबडी विक्रेत्यांच्या दुकानांची होणार तपासणी?

अनधिकृत असल्यास होणार कारवाई, महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील सर्व कोंबडी

Worli Century Mill : वरळीतील सेंच्युरी मिल, मुलुंड डम्पिंग ग्राऊंड तसेच सेव्हन हिल्स रुग्णालय भाडेतत्वावर देण्याचे प्रस्ताव मंजूर

महापालिका सभागृहात विरोधकांनी गोंधळ, महापौरांनी प्रस्तावांना दिली मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी): वरळीतील

Mumbai Water Crisis : मुंबईत पाणी प्रश्नावरून महापालिका सभागृह तापले

मालाडमध्ये अपुरा व गढूळ पाण्यावरून नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात रद्द

Sion Hospital : शीव रुग्णालयात डिजिटल पेमेंटची सुविधा

बाह्यरूग्ण विभागातील नोंदणीसाठी रूग्ण व नातेवाईकांना  घेता येईल  प्रायोगिक तत्वावर यूपीआयची सेवा मुंबई (