Anna Bansode : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तपदी अण्णा बनसोडे यांची निवड; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा पुढे नेण्याचा निर्धार

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'च्या (People Education Society) विश्वस्तपदी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक आणि सामाजिक वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, असा निर्धार अण्णा बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला.


मुंबईतील गरवारे क्लब येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavle) यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आमदार अण्णा बनसोडे यांची विश्वस्तपदी निवड करण्याची घोषणा करण्यात आली आणि कार्यकारिणीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.



शैक्षणिक कार्याला नवी दिशा मिळेल - रामदास आठवले


अण्णा बनसोडे यांच्या निवडीचे स्वागत करताना संस्थेचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले की, "अण्णा बनसोडे यांच्या रुपाने एक अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व संस्थेला मिळाले आहे. त्यांच्या निवडीमुळे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांना नक्कीच नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल."



वंचित घटकांसाठी काम करण्याचा निर्धार - अण्णा बनसोडे


आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना सक्षम करण्याच्या उदात्त हेतूने या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा विस्तार करणे, विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि बाबासाहेबांचे विचार तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे माझे प्राथमिक कर्तव्य असेल."



बैठकीस मान्यवरांची उपस्थिती


गरवारे क्लब येथे झालेल्या या बैठकीला संस्थेचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह माजी युजीसी अध्यक्ष सुखदेव थोरात, संचालक उज्ज्वल निकम, डॉ. वासुदेव गाडे, बी. के. बर्वे, विश्वास पाटील, डॉ. वेंकटा स्वामी, अरविंद सोनटक्के आणि डॉ. एस. के. भागवत यांच्यासह कार्यकारिणीचे इतर सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Vishwas Patil News: "दहिहंडीतील लावणी म्हणजे सूज..." , कादंबरीकार विश्वास पाटील यांची टीका

मुंबई: मुंबईमध्ये 'प्रकाशचित्रांतून लोक कलावंतांचे स्मृतीवंदन' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अखिल

Mumbai Municipal Corporation : महापालिका स्थायी समितीत यापुढे शिवसेना गटनेत्याचा न बसण्याचा निर्धार

कॉलनी ऑफीसरवरच नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप एसआरए अभय योजनेत कॉलनी अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप मुंबई

Mumbai Airport News : मुंबई विमानतळावरील अनधिकृत मशीद हटवा!

- ‘एमएमआरडीए’चे निर्देश; ‘लँड जिहाद’ झाल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज

Supreme Court Abu Salem: अबू सालेमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; 25 वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्याचा दावा फेटाळला

मुंबई : 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन (Pradeep Jain) यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची

MPSC Group C : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! गट-क पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल; 'या' दिवशी होणार नवी परीक्षा

मुंबई  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 25

Mumbai airport illegal mosque : मुंबई विमानतळ परिसरातील अनधिकृत मशिदीवर कारवाईचे MMRDA चे निर्देश; किरीट सोमय्या यांची FIR नोंदवण्याची मागणी

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) टर्मिनल २ (T2) परिसरातील