Dhule : धुळ्यात बिबट्याचा थरार ! अंगणातून दोन वर्षीय चिमुकल्याला उचललं अन्.... हृदयद्रावक घटना

Dhule : शिरपूर तालुक्यातील अर्थे (बु.) शिवारात बिबट्याने दोन वर्षीय चिमुकल्यावर हल्ला करून त्याला जबड्यात पकडून शेताच्या दिशेने ओढून नेल्याची हृदयद्रावक घटना घडलीय. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर वनविभाग, पोलीस आणि ग्रामस्थांनी रात्रभर शोधमोहीम राबवली. मात्र, गुरुवारी सकाळी चिमुकला योगेश पर्मिया सोंगळ याचे शरीराचे काही अवशेष तुरीच्या शेतात आढळून आले.



बिबट्याने अचानक झडप घातली अन्...


ही घटना अर्थे (बु.) येथील शेख रऊफ शेख सुलेमान खाटीक यांच्या शेतातील गट क्रमांक ५७ मध्ये घडली. मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील आत्मज येथील पुर्मिया कमल सोंगळ हे या शेतात सालदार म्हणून काम करतात. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास योगेश शौच करून पत्र्याच्या शेडजवळील अंगणात परतला होता. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. बिबट्याने योगेशला जबड्यात पकडून शेताच्या दिशेने धाव घेतली. मुलाला वाचवण्यासाठी योगेशच्या आई-वडिलांनी बिबट्याचा पाठलाग केला. मात्र, बिबट्या दाट पिकांमध्ये निघून गेल्याने त्याचा माग काढणे कठीण झाले.


घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक मोहन नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी, वन्यजीव अभ्यासक, शिरपूर शहर पोलीस आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात बिबट्याचे पगमार्ग आढळून आल्यानंतर थर्मल ड्रोनच्या सहाय्याने रात्री शोधमोहीम सुरू करण्यात आली. केळी, ऊस, पपई, तूर आणि कापूस अशी दाट पिके असल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण झाले. वनविभागाने दोन स्वतंत्र पथके तयार करून ठशांच्या आधारे शोधमोहीम सुरू ठेवली.



गुरुवारी शोधमोहीमेला धक्कादायक वळण


गुरुवारी सकाळी या शोधमोहीमेला धक्कादायक वळण मिळाले. घटनास्थळापासून सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरावरील तुरीच्या शेतात योगेशच्या शरीराचे काही अवशेष आढळून आले. डोक्याचा काही भाग, पाठीचा भाग, एक हात आणि एक पंजा आढळून आला असून इतर अवयव अद्याप सापडलेले नाहीत. वनविभागाच्या प्राथमिक पाहणीनुसार, उर्वरित अवयव बिबट्याने भक्ष्य केले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, याच परिसरात दीड ते दोन वर्षांचे बिबट्याचे पिल्लू वनकर्मचाऱ्यांना दिसून आले. न्यायवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून आवश्यक नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. परिसरात फिरणारी बिबट मादी आणि तिचे पिल्लू या हल्ल्यास कारणीभूत असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे.



वनविभागाचे आवाहन


बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरे लावण्यात आले असून ड्रोन, ट्रॅप कॅमेरे आणि विशेष गस्तीद्वारे शोधमोहीम सुरू आहे. शासनाच्या नियमानुसार वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या योगेशच्या पालकांना नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक मोहन नाईकवाडी यांनी दिली. बिबट्या जेरबंद होईपर्यंत नागरिकांनी रात्री घराबाहेर पडू नये, उघड्यावर झोपू नये, लहान मुलांना एकटे सोडू नये आणि शेतात काम करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे. तसेच पुढील दोन दिवस मजुरांना शेतात न पाठवण्याचा सल्लाही प्रशासनाने दिला आहे.

Comments
Add Comment

Maharashtra ports development : राज्यातील बंदरे आणि जलवाहतुकीला 'अर्थबळ' - १७० कोटींचा निधी मंजूर!

रस्ते, जेट्टी, पोहोचरस्ते आणि प्रवासी सुविधांच्या १०४ कामांना मंजुरी मुंबई : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील

Mumbai Goa Highway : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची वाहतूक सुरळीत राहावी आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग

Manoj Jarange News: १२ सप्टेंबरआधी मनोज जरांगेंचे उपोषण थांबवणार, मंत्री उदय सामंत; तोडगा काढण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून

Radhakrushn Vikhe Patil : जरांगेंच्या मुंबईत धडकण्याच्या घोषणेनंतर राज्य सरकार सावध; १२ सप्टेंबरच्या बैठकीकडे लक्ष

मागण्यांची पूर्तता सुरू असल्याची विखे पाटील यांची प्रतिक्रिया मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे

Dhule Crime : धुळे महसूल विभागात खळबळ ! फरार तलाठीसह तिघांना पोलीस कोठडी

Dhule Crime : धुळे जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हायवा वाहनातून गौण खनिजाची वाहतूक सुरळीत सुरू राहावी

बाप्पाच्या दर्शनासाठी Pune Metro सज्ज, गणेशोत्सवात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; वाचा एका क्लिकवर वेळापत्रक

पुणे: गणेशोत्सवाच्या काळामध्ये, पुणेकरांना महामेट्रोकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई- पुण्यामध्ये गणेशोत्सवासाठी