नवी मुंबई: विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. डिसेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार आहे. भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुधारित व्हेरिएबल टॅरिफ प्लॅनला (Variable Tariff Plan- VTP) मंजुरी दिली आहे. त्यामुळे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काला मोठी गती मिळणार आहे.
दुबई, अमेरिका की भारत... iphone 18 pro ची सीरीज सर्वाधिक महाग कोणत्या देशात?
मुंबई: ॲपलकडून नव्या iphone 18 pro ची सीरीज लाँच करण्यात आली. काल आयफोन लाँच झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. iphone 18 pro, iphone 18 pro max आणि iphone duo हे ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने मागणी केलेल्या सुधारित आराखड्यानुसार, सवलतीसाठीची पात्रता मुंबई महानगर प्रदेशातील नवीन मार्ग ऐवजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवीन मार्ग अशी करण्यात आली आहे. यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ज्या विमान कंपन्या नव्याने आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करणाऱ्या विमान कंपन्यांना लँडिंग शुल्कात (Landing Charges) भरीव सवलतींचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
नवीन आंतरराष्ट्रीय प्रवासी मार्ग असल्यामुळे पहिल्या वर्षी लँडिंग शुल्कात १००% पूर्ण सवलत मिळणार आहे. ५००० किमी पेक्षा कमी अंतर असणार्या मार्गांवर दुसऱ्या वर्षी ५०% सवलत मिळणार आहे. ५००० किमी पेक्षा जास्त अंतर अर्थात लांब पल्ल्यांच्या विमान प्रवास असणाऱ्या मार्गांवर दुसऱ्या वर्षी ५०% आणि तिसऱ्या वर्षी २५% सवलत मिळणार आहे. अतिरिक्त आंतरराष्ट्रीय फेऱ्या ज्या अस्तित्वात असलेल्या मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्यास ७५% पर्यंत सवलत मिळेल. आंतरराष्ट्रीय मालवाहू सेवाला पहिल्या वर्षी ९०% आणि दुसऱ्या वर्षी ५०% सवलत दिली जाणार आहे.
CM Devendra Fadnavis : गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
१० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हातांनी साकारले बाप्पा
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा महाराष्ट्राचा ‘गिनीज वर्ल्ड ...
विमान कंपन्यांसाठी हे सुधारित निकष नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवीन आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि मालवाहू उड्डाणे सुरू करू इच्छिणाऱ्या विमान कंपन्यांसाठी अधिक आकर्षक बनवत आहेत. यामुळे नवीन हवाई मार्गांचा जलद विकास होण्याची शक्यता आहे. शिवाय, नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून स्थान अधिक बळकट होईल. अधिक विमान कंपन्यांचा सहभाग आणि थेट आंतरराष्ट्रीय मार्गांमुळे प्रवाशांना अधिक पर्यायी गंतव्यस्थाने, सुधारित कनेक्टिव्हिटी आणि स्वस्त तिकीट दरात तिकिटे उपलब्ध होणार आहेत. मालवाहू विमानांसाठी दिलेल्या सवलतींमुळे या भागातील एअर कार्गो कनेक्टिव्हिटीच्या वाढीला मोठा पाठिंबा मिळेल. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) आणि सिडको (CIDCO) यांच्यातील सार्वजनिक- खाजगी भागीदारीतून (PPP) विकसित करण्यात आलेले
">नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) हे सुरुवातीच्या वार्षिक २ कोटी (२० दशलक्ष) प्रवासी क्षमतेवरून पूर्ण विकासानंतर ९ कोटी (९० दशलक्ष) प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन कार्गो हाताळणी क्षमतेपर्यंत वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.