मुंबई: iPhone प्रेमी गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण येऊन ठेपला. काल (09 सप्टेंबर- बुधवारी) रात्री iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max आणि ...
भारतात, iPhone 18 Pro च्या किंमतीत 1,64,900 रूपयांनी सुरूवात होते, iPhone 18 Pro Max च्या किंमतीत 1,79,900 रूपयांनी सुरूवात होते. तर, iPhone Duo च्या किंमतीत 2,99,900 रूपयांनी सुरूवात होते. असं असलं तरीही इतरत्र देशांमध्ये iphone 18 pro सीरीजच्या किंमतींमध्ये खूप तफावत पाहायला मिळते. अमेरिकेत, iphone 18 pro ची किंमत भारतीय चलनानुसार अवघी 1,14,064 इतकी रूपये आहे, तर iPhone Duo ची अमेरिकेत 1,90,170 रुपयांना मिळत आहे. दुसऱ्या क्रमांकावर कॅनडा असून तिकडे iPhone 18 Pro ची किंमत 1,20,453 रुपये आणि iPhone Duo ची किंमत 2,06,541 रुपयांपासून सुरू होते.
कुपर्टिनो (कॅलिफोर्निया) येथील प्रसिद्ध 'स्टीव्ह जॉब्स थिएटर'मध्ये ॲपलच्या भव्य सोहळ्याची पूर्ण तयारी झाली आहे. आज रात्री भारतीय वेळेनुसार १०:३० ...
युएईमध्ये जर तुम्ही iPhone 18 Pro खरेदी करणार असाल तर तुम्हाला 1,32,074 इतकी किंमत मोजावी लागेल आणि iPhone Duo खरेदी करणार असाल तर, 2,20,141 रूपये इतकी किंमत मोजावी लागेल. तर, तैवानमध्ये 1,35,014 रुपये तर जपानमध्ये 1,36,056 रुपयांपासून iPhone 18 Pro विक्रीसाठी उपलब्ध आहे. ब्रिटनमध्ये iPhone 18 Pro ची किंमत 1,53,872 रुपयांपासून सुरू होते, तर स्पेन आणि फ्रान्समध्ये iPhone 18 Pro ची किंमत 1,62,616 इतकी आहे. इतरत्र सर्व देशांच्या तुलनेमध्ये iphone 18 pro सीरीजची किंमत भारतात सर्वाधिक आहे. पण असं असलं तरीही भारतामध्ये आयफोन लव्हरची काही कमी नाही. येत्या 12 सप्टेंबरपासून भारतात iphone 18 pro सीरीजच्या बुकिंगला सुरूवात होणार आहे. तर, 18 सप्टेंबरपासून iphone 18 pro सीरीज भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.