मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) टर्मिनल २ (T2) परिसरातील व्हीआयपी आगमन आणि टॅक्सी स्टँडजवळ असलेल्या एका मशिदीच्या बांधकामावरून वाद निर्माण झाला आहे. हे बांधकाम पूर्णपणे अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ते हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
किरीट सोमय्यांची तक्रार
एमएमआरडीएचे स्पष्टीकरण
सोमय्या यांच्या तक्रारीची दखल घेत एमएमआरडीएने ८ सप्टेंबर २०२६ रोजी 'मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड'ला (MIAL) एक अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्रात प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, सदर मशिदीच्या/बांधकामाच्या जागेसाठी एमएमआरडीएकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. प्राधिकरणाच्या मंजूर विकास योजनेत (IDP) या अधिसूचित क्षेत्रात कोणत्याही सार्वजनिक प्रार्थनास्थळासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आलेली नाही. करारातील (OMDA) अटींनुसार, या परिसराचे नियोजन, विकास आणि सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही MIAL चीच आहे.
कारवाईचे निर्देश
या सर्व बाबी लक्षात घेता, नियमानुसार योग्य ती प्रक्रिया पार पाडून सदर अनधिकृत बांधकाम लवकरात लवकर हटवावे आणि याबाबतचा अहवाल सादर करावा, असे स्पष्ट आदेश एमएमआरडीएने एमआयएएल प्रशासनाला दिले आहेत.






