Mumbai airport illegal mosque : मुंबई विमानतळ परिसरातील अनधिकृत मशिदीवर कारवाईचे MMRDA चे निर्देश; किरीट सोमय्या यांची FIR नोंदवण्याची मागणी

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) टर्मिनल २ (T2) परिसरातील व्हीआयपी आगमन आणि टॅक्सी स्टँडजवळ असलेल्या एका मशिदीच्या बांधकामावरून वाद निर्माण झाला आहे. हे बांधकाम पूर्णपणे अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ते हटवण्याचे निर्देश दिले आहेत.



किरीट सोमय्यांची तक्रार


माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ५ सप्टेंबर २०२६ रोजी एमएमआरडीएकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. विमानतळासारख्या अत्यंत संवेदनशील आणि सुरक्षित ठिकाणी हे बेकायदेशीर बांधकाम उभारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी संबंधित ट्रस्टी आणि जबाबदार व्यक्तींवर एफआयआर (FIR) दाखल करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली आहे.



एमएमआरडीएचे स्पष्टीकरण


सोमय्या यांच्या तक्रारीची दखल घेत एमएमआरडीएने ८ सप्टेंबर २०२६ रोजी 'मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड'ला (MIAL) एक अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्रात प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, सदर मशिदीच्या/बांधकामाच्या जागेसाठी एमएमआरडीएकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. प्राधिकरणाच्या मंजूर विकास योजनेत (IDP) या अधिसूचित क्षेत्रात कोणत्याही सार्वजनिक प्रार्थनास्थळासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आलेली नाही. करारातील (OMDA) अटींनुसार, या परिसराचे नियोजन, विकास आणि सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही MIAL चीच आहे.



कारवाईचे निर्देश


या सर्व बाबी लक्षात घेता, नियमानुसार योग्य ती प्रक्रिया पार पाडून सदर अनधिकृत बांधकाम लवकरात लवकर हटवावे आणि याबाबतचा अहवाल सादर करावा, असे स्पष्ट आदेश एमएमआरडीएने एमआयएएल प्रशासनाला दिले आहेत.

Comments
Add Comment

MPSC Group C : स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! गट-क पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल; 'या' दिवशी होणार नवी परीक्षा

मुंबई  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 25

BMC News : मुंबई महापालिकेत दोन्ही शिवसेना एकत्र, भाजपचा सभात्याग

सुधार समितीत निर्माण झाला वाद, जोगेश्वरीतील प्रकल्प बाधितांच्या घरांची उभारणी करण्याचे आरक्षण रद्द वगळण्या

Goregaon Patra Chawl : गोरेगाव पत्राचाळीत परिसरातील आरक्षण बदलाचा प्रस्ताव फेटाळला

सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव फेरविचारसाठी पाठवला मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगावमधील वादग्रस्त

BMC Water Department : मुंबईतील पाणी साठे सॅटेलाईटद्वारे शोधा

गळती, अनधिकृत जोडणी, पाणी चोरी,नवीन बांधकामांचे पाणी रोखा; स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आदेश मुंबई (विशेष

BMC Marathi Exam : महापालिकेत मराठीची परीक्षा पास व्हावीच लागेल

स्थायी समितीने प्रशासनाचा प्रस्ताव परत पाठवला मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेचे कामकाज हे शंभर टक्के

BMC : बांधकाम व पाडकामादरम्यान निर्माण होणाऱ्या राडारोडाची महानगरपालिका संकेतस्थळावर नोंदणी बंधनकारक

दिनांक २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत नोंदणीसाठी मुदत मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबईत निर्माण होणाऱ्या बांधकाम आणि