Wednesday, September 9, 2026

Marathi Film Industry : मराठी चित्रपटांसाठी अधिक चित्रपटगृहे; रामटेक आणि नाशिकमध्ये नव्या फिल्म सिटीची तयारी

Marathi Film Industry : मराठी चित्रपटांसाठी अधिक चित्रपटगृहे; रामटेक आणि नाशिकमध्ये नव्या फिल्म सिटीची तयारी

62 वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्‍न

मुंबई : मराठी चित्रपटांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यात अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच चित्रपट निर्मितीसाठी आधुनिक सुविधा असलेली चित्रनगरी उभारण्याची तयारी राज्य सरकारकडून सुरू आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी आवश्यक सुविधा आणि तंत्रज्ञान एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ( Devendra Fadnavis)

मुंबईत झालेल्या 62 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी चित्रपटांमध्ये आशय, वैविध्य आणि वेगवेगळे प्रयोग करण्याची क्षमता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ( Marathi Film Industry)

चित्रपट निर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, विविध प्रकारचे सेट्स आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चित्रनगरी विकसित केली जाणार आहे. मराठी चित्रपटांना अधिक स्क्रीन मिळाव्यात यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच त्याबाबत माहिती जाहीर केली जाणार आहे. ( Maharashtra State Film Award)

दरम्यान, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रामटेक आणि नाशिक येथे नवीन फिल्म सिटी उभारण्याच्या दिशेने सरकारचे काम सुरू असल्याचे सांगितले. मुंबईतील फिल्म सिटी, एन. डी. स्टुडिओ आणि कोल्हापूरमधील चित्रिकरण सुविधांबरोबरच या नव्या प्रकल्पांमुळे राज्यातील चित्रपट निर्मितीला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

या सोहळ्यात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सलीम खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांनाही राज कपूर पुरस्काराने गौरवण्यात आले. विविध तांत्रिक विभागांतील उत्कृष्ट कामासाठीही पुरस्कार प्रदान करण्यात आले. ( Government of Maharashtra)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >