मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणारी ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही 3 जानेवारी 2027 रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर घेतली जाणार आहे. त्यामुळे या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना नव्या तारखेनुसार अभ्यासाचे नियोजन करावे लागणार आहे. ( MPSC Group C)
BMC News : मुंबई महापालिकेत दोन्ही शिवसेना एकत्र, भाजपचा सभात्याग
सुधार समितीत निर्माण झाला वाद, जोगेश्वरीतील प्रकल्प बाधितांच्या घरांची उभारणी करण्याचे आरक्षण रद्द वगळण्या प्रस्ताव मंजूर
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ...
आयोगाने जाहिरात क्रमांक 017/2026 अंतर्गत या परीक्षेचे आयोजन केले होते. यापूर्वी 25 ऑक्टोबर 2026 रोजी ऑफलाइन OMR पद्धतीने परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, विविध प्रशासकीय आणि स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांची उपलब्धता आणि जिल्हा प्रशासनाकडून मिळालेले अहवाल यांचा विचार करण्यात आला. तसेच सणासुदीचा कालावधी, स्थानिक परिस्थिती आणि वाहतूक व्यवस्थेचा परीक्षेवर होणारा परिणाम लक्षात घेण्यात आला आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर सुरक्षितपणे आणि वेळेत पोहोचता यावे, यासाठीही या बाबींचा विचार करण्यात आला. ( MPSC Exam Update)
याशिवाय राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 चे नियोजन, इतर भरती संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन या बाबींचाही आढावा घेण्यात आला. त्यानंतर परीक्षेची सुधारित तारीख निश्चित करण्यात आली आहे. ( MPSC Exam New Date)
परीक्षेचे नवीन प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र, वेळ आणि इतर आवश्यक सूचना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे माहिती तपासावी. नव्या तारखेनुसार अभ्यासाचे नियोजन करून परीक्षेची तयारी सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.