सुधार समितीत निर्माण झाला वाद, जोगेश्वरीतील प्रकल्प बाधितांच्या घरांची उभारणी करण्याचे आरक्षण रद्द वगळण्या प्रस्ताव मंजूर
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील सुधार समितीच्या बैठकीत जोगेश्वरी मजास येथील ७, नगर भू क्रमांक १५६ ए अंशत: व १६० ए १ धारण करणाऱ्या जमिनीवरील प्रकल्पबाधितांची घरे बांधण्याकरता टाकण्यात येणारे पुनर्वसन व पुनर्स्थापना हे आरक्षण रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे हा प्रस्ताव पुढील बैठकीपर्यंत राखून ठेवण्याची मागणी भाजपने केली होती. परंतु सुधार समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी हा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे भाजपने या समितीतून सभात्याग केला. मात्र,एरव्ही आरक्षण रद्द करण्याच्या मुद्दयावरून विरोध करणारे उबाठा, काँग्रेस आणि मनसेने कोणताही विरोध न करता शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे जोगेश्वरीतील आरक्षण रद्द करण्यासाठी दोन्ही शिवसेना अणि काँग्रेस एकत्र असल्याचे दिसून आले.
मुंबई महापालिकेच्या सुधार समितीच्या बैठकीत के/पूर्व विभागातील मौजे मजास येथील ७. न.भू.क्र. १५६१ (पार्ट), १६०-१ (पार्ट) धारण करणाऱ्या विवक्षित क्षेत्रफळाच्या भूखंडावरील (पुनर्वसन व पुनर्स्थापना) हे आरक्षण रद्द करुन या आरक्षणातून मोकळे झालेले विवक्षित क्षेत्र लगतच्या निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याकरिता, मंजूर विकास आराखडा, २०३४ मध्ये फेरबदल करण्याच्या प्रस्ताव मागील महिन्यांच्या सभेच्या पटलावर आला होता. हा प्रस्ताव मागील सभेत राखून ठेवला होता.
स्थायी समितीने प्रशासनाचा प्रस्ताव परत पाठवला मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेचे कामकाज हे शंभर टक्के मराठी असून प्रत्येक अमराठी ...
पण बुधवारी झालेल्या सुधार समितीच्या सभेत तहकूब प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपचे प्रकाश गंगाधरे, स्वप्ना म्हात्रे यांनी हा प्रस्ताव राखून ठेवण्याची मागणी केली. परंतु ही मागणी असतानाही शिवसेनेच्या सदस्यांनी हा प्रस्ताव मंजूर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार सुधार समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे सलग दोन बैठकांमध्ये प्रस्ताव राखून ठेवण्याची मागणी केल्यानंतरही मंजूर केल्यामुळे अध्यक्षांच्या या कृतीचा तीव्र निषेध व्यक्त करत भाजपच्या सर्व सदस्यांनी सभात्याग केला
स्थायी समितीने प्रशासनाचा प्रस्ताव परत पाठवला मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेचे कामकाज हे शंभर टक्के मराठी असून प्रत्येक अमराठी ...