Nashik : रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी सप्तशृंगीगड ते नांदुरी घाटरस्ता (Saptashrungigad to Nanduri Ghat Road) तब्बल १६ दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. अखेर या निर्णयात प्रशासनाने बदल केला आहे. नांदुरी ते सप्तशृंगगड या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीवर निर्बंध घालण्याबाबत प्रशासनाने सुधारित आदेश जारी केला आहे. त्यामुळे स्थानिक तसेच भाविक आणि मोठा दिलासा मिळाला आहे.
'या' दिवशी मार्ग राहणार खुला
१० सप्टेंबर २०२६ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत रस्ता बंद ठेवण्यात येणार असला, तरी भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेता काही दिवस म्हणजे आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित आदेशानुसार शनिवार दि. १२ सप्टेंबर, रविवार दि. १३ सप्टेंबर, शनिवार दि. १९ सप्टेंबर, रविवार दि. २० सप्टेंबर तसेच शनिवार दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी नांदुरी–सप्तशृंगगड मार्ग वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे. त्यामुळे सप्ताह अखेर देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Simhastha Mahakumbh Mela 2027 : ‘सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धे’त (‘Simhastha Mahakumbh’ Ganesh Mandal Competition) नाव नोंदवू इच्छिणाऱ्या मंडळांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण ‘सिंहस्थ महाकुंभ ...
पायी मार्ग नियमित सुरू
रस्ता बंद असलेल्या दिवसांमध्ये नांदुरी ते सप्तशृंगगड पायी जाणारा मार्ग नियमित खुला राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका आणि स्कूल बस यांना आवश्यकतेनुसार मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रस्त्याचे काम सुरू असताना नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि बंद कालावधीत विनाकारण वाहन घेऊन या मार्गावर येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.