Ramabai Ranveer : रामाबाईंच्या जिद्दीची सचिन तेंडुलकरने घेतली दखल; मुलींसह चौघांना दिली खास भेट

बीड : मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी मॅरेथॉनमध्ये धावून ३ हजार रुपयांचे बक्षीस जिंकणाऱ्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या ४७ वर्षीय रामाबाई रणवीर यांच्या जिद्दीची दखल सचिन तेंडुलकरने घेतली आहे. रामाबाईंच्या संघर्षाची कहाणी समजल्यानंतर तेंडुलकरने त्यांना रनिंग शूज देण्याची इच्छा व्यक्त केली. (Ramabai Ranveer)


सचिन तेंडुलकरच्या Ten X You टीमने परस्पर परिचितांच्या माध्यमातून रामाबाईंशी संपर्क साधला. रामाबाईंकडे स्वतःचा मोबाईल फोन नसल्याने त्यांच्या अंबाजोगाई येथील घरी रनिंग शूज पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली.


मात्र, शूज मिळाल्यानंतर रामाबाईंनी दाखवलेली उदारता विशेष ठरली. ज्या व्यक्तीने त्यांना मॅरेथॉनबद्दल माहिती दिली, त्यालाही शूज मिळावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्याच्या प्रोत्साहनामुळेच आपण या शर्यतीत सहभागी होऊ शकलो, असे रामाबाईंनी सांगितले. (Ramabai Ranveer)



रामाबाईंची ही विनंतीही तेंडुलकरच्या टीमने मान्य केली. त्यानुसार रामाबाई, त्यांच्या दोन मुली आणि मॅरेथॉनचे आयोजन करणाऱ्या समितीतील ज्या सदस्याने त्यांना या स्पर्धेची माहिती दिली, अशा चौघांसाठी रनिंग शूजची व्यवस्था करण्यात आली. (Ramabai Ranveer)


दरम्यान, सचिन तेंडुलकरने आपली कहाणी पाहिली असून त्याला आपली जिद्द प्रेरणादायी वाटल्याचे समजल्याने रामाबाईंना विशेष आनंद झाला. त्यांच्यासाठी ही भेट केवळ रनिंग शूजची नसून, त्यांच्या संघर्षाची दखल घेत मिळालेल्या प्रोत्साहनाची आणि कौतुकाचीही आहे. (Ramabai Ranveer)

Comments
Add Comment

भुवनेश्वर कुमारच्या अपयशाचे कारण काय? प्रशिक्षकाने दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...

स्विंगचा किंग असलेल्या भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीची जादू काही पहिल्या दोन टी20 सामन्यात चालली नाही. खरं तर चार

IPL 2027: कोणत्या खेळाडूंना संघ कायम ठेवणार? रिटेन्शनची शेवटचा तारीख जाहीर, गोव्यात होणार ऑक्शन

[caption id="attachment_1069478" align="aligncenter" width="800"] आयपीएल 2027 अर्थात 20व्या पर्वाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.आयपीएल 2027 साठी सर्व संघांनी

IND vs NZ 3rd T20I : ईशान किशन OUT! वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी; फलंदाजी क्रमात बदल होणार?

वेलिंग्टन (न्यूझीलंड): भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ईशान किशन दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नसल्याने

न्यूझीलंडसाठी करो या मरोची स्थिती! तर भारताला मालिका विजयाची संधी, तिसरा टी20 सामना कुठे पाहणार? जाणून घ्या

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यावर

India A vs NZ A Test: देवदत्त पडिक्कलचं द्विशतक एका धावेने हुकलं! अंपायरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह; 199 धावांवर बाद

लिंकन, न्यूझीलंड : भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज

एल क्लासिकोमध्ये एमबाप्पेचा डबल धमाका! रिअल माद्रिदचा बार्सिलोनावर 2-1 ने विजय; 100 गोलांचा ऐतिहासिक टप्पा गाठला

बार्सिलोना : फुटबॉल विश्वातील प्रतिष्ठेच्या एल क्लासिको सामन्यात रिअल माद्रिदने बार्सिलोनाचा 2-1 असा पराभव केला.