Thursday, September 10, 2026

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने 'मोदी एक्सप्रेस' आज रवाना होणार

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने 'मोदी एक्सप्रेस' आज रवाना होणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेली 'मोदी एक्सप्रेस' शुक्रवारी रवाना होणार आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही 'मोदी एक्सप्रेस' ही विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. मागील चौदा वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या या उपक्रमामुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांचा गावी जाण्याचा प्रवास अधिक सुकर होणार असून, सकाळी १०.३० वाजता दादर रेल्वे स्थानकातून ही गाडी कोकणाकडे मार्गस्थ होईल. (Nitesh Rane)

मुंबईहून निघाल्यानंतर ही ट्रेन रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली असा प्रवास करत सावंतवाडी या तिच्या अंतिम मुक्कामावर पोहोचेल. कोकणवासीयांची ही लाडकी 'मोदी एक्सप्रेस' ११ आणि १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून कोकणाच्या दिशेने रवाना होईल. नेहमीप्रमाणे या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी मोफत खानपान व्यवस्था करण्यात आली आहे. (Nitesh Rane)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >