Devendra Fadnavis : करपलेल्या पिकांचे शेतात जाऊन तात्काळ सर्वेक्षण करा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश; महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे पाहणी करणार


मुंबई : पावसाने दडी मारल्याने उभी पिके करपलेल्या भागांतील नुकसानीचे आता शेतात जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे ही पाहणी करणार असून, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर नियमांनुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना याबाबत आदेश दिल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिली. (Devendra Fadnavis)


राज्यात काही भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे उभी पिके करपली असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अधिकारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर प्राप्त अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना मदत देण्याची कार्यवाही केली जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.  (Devendra Fadnavis)



नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देताना शासनाच्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे. महसूल, कृषी आणि ग्रामविकास या तीन विभागांकडून संयुक्तपणे सर्वेक्षण केले जाणार असल्याने नुकसानीची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया समन्वयाने राबविण्यात येणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.


दरम्यान, मराठा-कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपाबाबतही बावनकुळे यांनी माहिती दिली. मराठवाड्यात मराठा-कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू असून, यापूर्वीही त्यासाठी शिबिरे घेण्यात आली होती. प्रमाणपत्र वितरणासाठी शासनाने यापूर्वीच पुढाकार घेतला असून, जात प्रमाणपत्रेही वितरित करण्यात आली आहेत. विहित नियमावलीनुसार अशी शिबिरे घेणे हे शासनाचे धोरणच असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. (Devendra Fadnavis)

Comments
Add Comment

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १ हजार ८०० कोटींचा निधी

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) कामांसाठी राज्य सरकारने गुरुवारी १

MMRDA transfer : एमएमआरडीएच्या सामाजिक विकास शाखेत मोठा फेरबदल; १६ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या, अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी

Mumbai : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या सामाजिक विकास विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल

Dhule : धुळ्यात बिबट्याचा थरार ! अंगणातून दोन वर्षीय चिमुकल्याला उचललं अन्.... हृदयद्रावक घटना

Dhule : शिरपूर तालुक्यातील अर्थे (बु.) शिवारात बिबट्याने दोन वर्षीय चिमुकल्यावर हल्ला करून त्याला जबड्यात पकडून

Sanjay Dutt Controversy : ‘जय महाराष्ट्र’ म्हणत संजय दत्तचा प्रताप सरनाईकांना फोन; मराठी भाषेबाबतच्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली दिलगिरी

ठाणे : ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्यात अभिनेता संजय दत्तने केलेल्या मराठी

Mumbai Monorail : मुंबई मोनोरेलला पुन्हा ब्रेक! सुरक्षा जाळ्यांमुळे सेवा सुरू होण्यास आणखी विलंब?

Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची वाहतूक सेवा असलेली मोनोरेल पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा आणखी लांबण्याची

Saifee Hospital Defamation Case : सैफी रुग्णालयाचा महिला डॉक्टरविरोधात १२५ कोटींचा मानहानीचा दावा; छळाच्या आरोपांवरून वाद आता न्यायालयात!

मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध सैफी रुग्णालयाने (Saifee Hospital) आपल्या एका प्रथम वर्षाच्या प्रशिक्षणार्थी (ट्रेनी)