BMC Fire Brigade : अंधेरीतील अग्निशमन दल आणि महापालिका चौकीचे आरक्षण वगळण्याचा प्रयत्न

आरक्षण बदलाचा प्रस्ताव सुधार समितीने फेटाळून लावला


आरक्षण नको असे रिमार्क देणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करा


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा भागात अग्निशमन दलाच्या केंद्र उभारणीचे आरक्षण भूखंडावर असतानाही अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी केंद्राची आवश्यकता नाही,असे लिहून दिले आहे. त्यामुळे अग्निशमन केंद्राचे आरक्षण रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिकेव्या विकास नियोजन विभागाच्यावतीने सादर करण्यात आला होता. परंतु या भागांत अग्निशमन केंद्राची आवश्यकता असून अशाप्रकारे केंद्राची आवश्यकता नाही असे लिहून देणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करा अशी मागणी करत हा प्रस्तावच सुधार समितीने फेटाळून लावला.



अंधेरी पश्चिम येथील महापालिकेच्या 'के/पश्चिम' विभागातील न.भू.क्र.११०३ अ (भाग), वर्सोवा या भूखंडावरील महानगरपालिका चौकी व अग्रिशमन केंद्र हे आरक्षण वगळून या भूखंडाचा समावेश निवासी क्षेत्रात करण्याबाबत तसेच न.भू.क्र. ११०३ अ (भाग), वर्सोवा या भूखंडावरील महानगरपालिका चौकी या स्थलांतरित आरक्षणाच्या क्षेत्रफळात दुरूस्ती करणेबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या विकास नियोजन विभागाच्यावतीने आरक्षण वगळण्याचा प्रस्ताव सुधार समितीला सादर केला होता. भाजपचे संदीप पटेल यांनी हा प्रस्ताव परत पाठवण्याची मागणी केली. आंबिवली आणि वर्सोवा दरम्यान अग्निशन दलाची गाडी यायला अर्धा तास लागतो. त्यामुळे कुणाच्या सांगण्यानुसार हे आरक्षण रद्द करण्यात येवू नये. म्हाडानेही अशाप्रकारचा प्रस्ताव विचार करून आणायला हवा. अग्निशनम केंद्र आणि महापालिका चौकी या आवश्यक आहेत म्हणून सन २०३४च्या आराखड्यात याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे निवासी क्षेत्र कुणाच्या सांगण्यानुसार होते याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.


तर उबाठाचे सचिन पडवळ यांनीही हा प्रस्ताव परत पाठवण्याच्या सूचनेला पाठिंबा देत हे आरक्षण चुकून पडलेले नाही तर गरज आहे म्हणून पाडलेले आहे. त्यामुळे एकदा टाकलेले आरक्षण रद्द करण्याचा अधिकार यांना कुणी दिला असा सवाल करत अशाप्रकारे आरक्षण रद्द करण्याचा अधिकार हा अधिकाऱ्यांना न देता महापालिकेच्या आयुक्तांकडे देण्यात यावा अशी सूचना त्यांनी केली. त्यानंतर हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवण्यात आला.

Comments
Add Comment

BMC News : एकाच पदावर १० ते १२ वर्षांपासून काम करणाऱ्यांच्या त्वरीत बदली करा

महापालिका स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील विविध खाते आणि

BMC News : महापालिकेच्या भूखंडावरील रखडलेले पुनर्विकास प्रकल्पांच्या माहितीचा मासिक अहवाल मागवला

सुधार समितीच्या पटलावर अहवाल ठेवण्याचे अध्यक्षांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या

Mumbai Cleanliness Workers : मुंबईतील स्वच्छता कामगारांच्या कामांची व्याप्ती वाढली

आता खुल्या आणि बंदिस्त नाल्यांसह अंतर्गत गटारांचीही करावी लागणार स्वच्छता शौचालयांच्या देखभाल आणि स्वच्छतेचे

BMC Ganeshotsav : मुंबईतील श्रीगणेशोत्सव पूर्वतयारीची महापौर

रितू तावडे यांनी केली पाहणी, महापौरांनी व्यक्त केले समाधान मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्रीगणरायाचे आगमन आणि

PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त गणेश मंडळांनी विशेष महाआरती!

मुंबईतील १२ हजार गणेश मंडळांना गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन ! मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हिंदू संस्कृती आणि सण

Mumbai News : घरीच झालेल्या प्रसूत झालेल्या महिलेची आनंदीबाई जोशी प्रसूतीगृहात यशस्वी प्रसूती

माता आणि बाळ दोघांची प्रकृती ठिक महिला बाल कल्याण समिती अध्यक्षा आणि आरोग्य समिती अध्यक्षांनी भेट घेत मातेच्या