Nashik : कुंभमेळ्याची कामे १५ दिवस बंद राहणार, नाशिक महापालिकेचा मोठा निर्णय; कारण काय ?

Nashik : २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत. शहरातील २८ प्रमुख रस्त्यांचाही यात समावेश आहे. रस्त्यावर होणारे खोदकाम यामुळे गणेश मंडपांसमोर खड्डे व तत्सम कुठल्याही अडचणी गणेश मंडळासमोर राहणार नाहीत यासाठी कुंभमेळ्याची सुरू असलेली विविध कामे पंधरवड्यासाठी बंद करण्याचे निर्देश महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिले आहेत.



कुंभमेळ्याची कामे १५ दिवस बंद राहणार


कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कोट्यवधी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये शहरातील २८ प्रमुख रस्त्यांचाही समावेश आहे. त्यासोबतच इतरही काही कामांसाठी खोदकाम सुरु आहे. अशा परिस्थितीत गणेश मंडळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही मंडळांना मंडप उभारण्यासाठीही जागा राहिली नाही, त्यामुळे त्यांना अन्यत्र स्थलांतर करावे लागले. तर काही मंडपाचा आकारही लहान करावा लागला. खड्डेमय रस्ते व खोदकामाच्या तक्रारी लक्षात घेऊन महापौरांनी गणेशोत्सव आणि पारंपरिक मिरवणूक विनाअडथळा पार पडावी यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि गणेश मंडळांनी समन्वय साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेश मंडळांच्या मंडपांसमोरील खड्डे बांधकाम विभागाने युद्धपातळीवर बुजवावेत. शहरात सुरू असलेली विविध कामे गणेशोत्सवाच्या काळात थांबवण्यात यावीत, असेही महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी सूचित केले.



सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करा


सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे. १५ सप्टेंबरपासून आपण स्वतः आयुक्तांसमवेत रस्त्यावर उतरून पाहणी करणार असल्याचे महापौर आहेर यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी महावितरणला कानपिचक्या देत कामात सुसूत्रता आणावी आणि एक समन्वयक ठेवण्याची सूचना केली. मंडळांकडून मोफत वीजपुरवठ्याची मागणी होत आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत विभागीय स्तरावर एकूण सहा लाखांहून अधिक रुपयांची पारितोषिके देण्याची घोषणा देखील करण्यात आली.

Comments
Add Comment

Cine Kind Awards 2026 : सिनेविश्वातील सामाजिक संवेदनशीलतेचा गौरव; वामिका-जॉन-रवीना यांना ‘सिने काइंड अवॉर्ड्स’ने सन्मानित

मुंबई : चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक कार्ये आणि संवेदनशीलता यांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींचा गौरव

Ambernath beef truck : अंबरनाथमध्ये १६.८ टन संशयित गोमांसाचा ट्रक जप्त? पोलिसांच्या कारवाईने खळबळ

ठाणे : अंबरनाथ परिसरात मोठ्या प्रमाणात संशयित गोमांसाची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आल्याची माहिती आहे. एका

Live Event SOP : ‘लाइव्ह इव्हेंट’साठी राज्य सरकारकडून ‘एसओपी’

- १५ दिवस आधी अर्ज बंधनकारक; पूर्वमंजूर ठिकाणांना पुनर्तपासणीतून सवलत मुंबई : संगीत कार्यक्रम, सांस्कृतिक

Box Office Collection : ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! जगभरात 200 कोटींचा टप्पा पार

Mumbai : ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसीरिजच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पंकज त्रिपाठी, अली फजल आणि

MPSCच्या सचिवांना काळे फासल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडवर कारवाई करणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: नवी मुंबईतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कार्यालयात घुसून सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या

Eknath Shinde : लंडनमध्ये होणार 'विश्व मराठी साहित्य संमेलन'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

महाराष्ट्र मंडळाकडून ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मान लंडन : जगभरातील मराठी बांधव, उद्योजक आणि