BRICS Summit : BRICS परिषदेसाठी शी जिनपिंग भारतात दाखल ! शी जिनपिंग भारतात काय काय घेऊन आले ?

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या BRICS परिषदेच्या पार्श्वभूमीवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात दाखल झाले आहेत. तब्बल सात वर्षांनंतर जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी त्यांचं विमान पालम विमानतळावर उतरलं. यापूर्वी २०१९ मध्ये ते भारतात आले होते. या परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह जगातील अनेक देशांचे प्रमुख भारतात दाखल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या परिषदेकडे लागलं आहे.



मोदी-जिनपिंग यांच्यात आज महत्त्वाची बैठक


शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज सायंकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध, व्यापार, सुरक्षा आणि सीमावादासह विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. २०१९ नंतर भारत आणि चीन यांच्यात सीमेच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला होता. मात्र, मागील काही काळात दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सुधारताना दिसत आहेत. त्यामुळे मोदी-जिनपिंग भेटीकडे विशेष महत्त्वाने पाहिलं जात आहे.



शी जिनपिंग भारतात काय काय घेऊन आले ?


शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यांच्या सुरक्षेसाठी चीनची विशेष टीम आधीच दिल्लीत दाखल झाली होती. जिनपिंग यांच्यासोबत त्यांचा मोठा ताफाही भारतात आला आहे. चीनच्या अध्यक्षांसाठी खास सुरक्षा असलेल्या Hongqi N701 आर्मर्ड लिमोझिन कारचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ही कार बुलेटप्रूफ ग्लास, मजबूत आर्मर आणि बुलेटप्रूफ टायरसारख्या सुरक्षा सुविधांनी सज्ज असल्याचं सांगितलं जात आहे. शी जिनपिंग हे Air China च्या Boeing 747-8 विमानातून भारतात दाखल झाले. हे विमान चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या विशेष प्रवासासाठी वापरलं जातं. जिनपिंग यांच्यासोबत त्यांची अधिकारी आणि सुरक्षा टीमही भारतात आली आहे.



भारत-चीन संबंध सुधारण्याचे संकेत ?


अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतर चीनने अमेरिकेविरोधात भूमिका घेत भारताला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांचा भारत दौरा आणि मोदींसोबतची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. BRICS परिषद, मोदी-जिनपिंग भेट आणि दोन्ही देशांमधील सुधारते संबंध यामुळे या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

Crime News : अरे देवा... ! लग्न झालं, पण नववधू सासरी पोहोचलीच नाही ! वराला रस्त्यात उतरवून...

UP Crime News : लग्नानंतर नववधूसोबत सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या वराला धक्कादायक फसवणुकीचा सामना करावा लागलाय. उत्तर

मोदी-जिनपिंग भेटीदरम्यान मोठी घडामोड! ६ वर्षांचा दुरावा संपला, भारत-चीन विमानसेवा पुन्हा सुरू

नवी दिल्ली: भारत आणि चीन दरम्यानचे राजनैतिक आणि आर्थिक संबंध पुन्हा एकदा सुरळीत होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे

Assam Elephant Rescue : टायरच्या विळख्यात अडकला हत्ती; वन विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी वाचला जीव!

आसाम : गोलाघाट जिल्ह्यात एका जंगली हत्तीच्या मानेभोवती ट्रॅक्टरचा मोठा टायर अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली

Nanded accident : नांदेडच्या भीषण अपघाताने देश हादरला! पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख, जखमींना ५० हजारांची मदत

नांदेड जिल्ह्यातील भीषण रस्ते अपघाताने महाराष्ट्र हादरला आहे. नांदेड-भोकर मार्गावरील सीताखंडी घाट परिसरात

BRICS Summit 2026 : ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष भारतात दाखल; पंतप्रधान मोदींसोबत आज महत्त्वाची द्विपक्षीय बैठक

नवी दिल्ली: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाले

Bank Holiday : बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून सलग सुट्ट्या, अनेक राज्यांत बँका काही दिवस बंद राहणार

नवी दिल्ली: बँकेत महत्त्वाचं काम असेल तर ग्राहकांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. बँक कर्मचारी संघटनांनी