ठाणे : भिवंडी शहरातील कामतघर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Bhiwandi Hit and Run)
मिळालेल्या माहितीनुसार, कामतघर भागातील भाग्यनगर गेट समोर हा अपघात घडला. राजू गोलर आणि त्यांचा मित्र सोहेल शेख हे दोघे आपल्या दुचाकीवरून जात असताना, एका अज्ञात कारचालकाने भरधाव वेगाने येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.(Bhiwandi Hit and Run)
एक्स्ट्रामॅरिटल अफेअरमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याच्या घटना समोर येतात. अशातच ब्युटिशियन सोनिता शर्मा यांच्या मृत्यूच्या प्रकरणाने ...
धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही जखमींना भिवंडीतील नोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या अपघातात सोहेल शेख याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर राजू गोलर याला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
अपघाताचा संपूर्ण थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यात कारचा वेग आणि दुचाकीला झालेली जोरदार धडक स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पसार झालेल्या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून फरार चालकाचा शोध सुरू असून, शहर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. (Bhiwandi Hit and Run)