Asian Games 2026 : सुचिका तरियालने रचला इतिहास ! मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये भारताला पहिलं कांस्यपदक

Asian Games 2026:शियाई क्रीडा स्पर्धेत भारताने मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये (MMA) इतिहास रचला आहे. 36 वर्षीय सुचिका तरियालने महिलांच्या 60 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावत भारताला MMAमधील पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं आहे.



उपांत्य फेरीत पराभव, अश्रू अनावर


सोमवारी झालेल्या उपांत्य फेरीत सुचिकाचा सामना सिंगापूरच्या तेओ हुई हून हिच्याशी झाला. दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत झाली. सुचिकाने शेवटपर्यंत जोरदार झुंज देत सामना ओव्हरटाइमपर्यंत नेला. मात्र, पंचांचा निर्णय सिंगापूरच्या खेळाडूच्या बाजूने गेला. निकाल जाहीर झाल्यानंतर सुचिका भावूक झाली आणि तिच्या डोळ्यांत अश्रू आले. अंतिम फेरीत प्रवेश न मिळाल्याची निराशा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. उपांत्य फेरीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंना अधिकृत पदक समारंभासाठी पोडियमवर बोलावण्यात आलं. मात्र, निकालामुळे निराश झालेल्या सुचिकाने सुरुवातीला पोडियमवर जाण्यास नकार दिला. भारतीय प्रशिक्षकांनी तिला समजावून सांगितल्यानंतर ती पोडियमवर गेली. यावेळी तिच्या डोळ्यांत अश्रू होते. एका बाजूला भारतासाठी ऐतिहासिक पदक जिंकल्याचा आनंद, तर दुसरीकडे अंतिम फेरीत पोहोचता न आल्याची खंत, अशा संमिश्र भावना तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या.



मंगोलियन खेळाडूचा पराभव करत पदक निश्चित


यापूर्वी रविवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत सुचिकाने मंगोलियाच्या अल्तांचिमेग बायगलमाचा 2-0 असा पराभव केला होता. या विजयासह तिने भारताचं MMAमधील पदक निश्चित केलं होतं. विशेष म्हणजे, 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत MMAचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. याशिवाय BMX, टेकबॉल, पॅडेल, सर्फिंग आणि व्हर्च्युअल तायक्वांदो यांसारख्या क्रीडा प्रकारांचाही यंदाच्या स्पर्धेत प्रथमच समावेश झाला आहे.



सात वर्षांच्या ब्रेकनंतर MMAमध्ये पुनरागमन


सुचिका तरियालने 2017 मध्ये MMAमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर जवळपास सात वर्षे ती MMAपासून दूर राहिली. या काळात तिने ज्युडो आणि जिऊ-जित्सूमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. 2024 मध्ये तिने ब्रेव्ह कॉम्बॅट फेडरेशनसोबत करार केला. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये बहरीन येथे झालेल्या BRAVE CF 92 स्पर्धेतून तिने व्यावसायिक MMAमध्ये पुनरागमन केलं. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आता सुचिका तरियालने आशियाई क्रीडा स्पर्धेत MMAमध्ये भारताचं पहिलं ऐतिहासिक पदक जिंकत आपल्या नावाची नोंद केली आहे.

Comments
Add Comment

Asian Games 2026 : नेमबाजीत भारताला आणखी एक रौप्यपदक, पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल टीमने मिळवून दिलं पदक

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या पदकांची संख्या वाढली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने

Sports minister India : क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांकडून जपानमध्ये 'संडेज ऑन सायकल'चे नेतृत्व; आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचा वाढवला उत्साह!

नागोया (जपान) : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी जपानमधील नागोया येथील मेईजो

Asian Games 2026 : भारतीय पुरुष हॉकी संघाची इंडोनेशियावर १३-१ ने दणदणीत मात; दिलप्रीत सिंगचे तुफानी चार गोल!

नागोया (जपान) : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या मोहिमेची भारतीय पुरुष हॉकी संघाने अत्यंत दणदणीत आणि ऐतिहासिक

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांची दुहेरी पदकांसह दमदार सुरुवात; एलावेनिलला वैयक्तिक रौप्य पदक

नागोया (जपान) : आशियाई क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीच्या मोहिमेची भारताने दमदार सुरुवात केली असून, स्पर्धेच्या

Asian Games 2026 : शफाली वर्माचे शतक अन् गोलंदाजांचा पराक्रम; बांगलादेशचा ११४ धावांनी धुव्वा उडवत भारतीय महिला संघ अंतिम फेरीत!

नागोया (जपान): आशियाई खेळ २०२६ मधील महिला क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी सुरू ठेवित अंतिम फेरीत

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाचा उझबेकिस्तानवर १९-० ने दणदणीत विजय; दीपिकाचे ऐतिहासिक ८ गोल

नागोया (जपान) : आशियाई खेळ २०२६ (Asian Games 2026) मधील आपल्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने