तुम्ही ट्रेनने प्रवास करण्यासाठी प्लॅटफॉर्म आल्यानंतर अनेकदा ट्रेनमधून वाहन घेऊन जात असल्याचं पाहिलं असेल. सायकल, बाइक किंवा स्कूटर एका शहरातून दुसऱ्या शहरात नेण्यासाठी रेल्वे सुविधांचा वापर केला जातो. खासकरून लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर ही वाहनं ट्रेनमधून नेण्याचा उत्तम पर्याय ठरतो. पण भारतीय रेल्वेतून दुचाकी घेऊन कशी जातात? त्यासाठी काय प्रोसेस आहे? असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहात नाही. भारतीय रेल्वेतून वाहनं घेऊन जाण्याची दोन पद्धती आहेत. पहिलं म्हणजे सामान म्हणून आणि दुसरं म्हणजे पार्सल म्हणून... चला जाणून दोन्ही पर्यायांमध्ये नेमका काय फरक आहे आणि किती खर्च येतो.
दुचाकी ट्रेनने पाठवण्यासाठी दोन पर्याय
तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर दुचाकी तुम्ही सामान म्हणून बुक करू शकता. या पर्यायामध्ये तुमचं वाहन लगेजमध्ये ठेवलं जातं. या डब्ब्याला ब्रेक वॅन असंही संबोधलं जातं. पण यासाठी प्रवाशाला तीन ते चार तास आधीच रेल्वे स्टेशनवर पार्सल कार्यालयात दाखल व्हावं लागतं. तेथे तुम्हाला कन्फर्म तिकीट दाखवून एक फॉर्म भरावा लागतो. आवश्यक ते शुल्क भरल्यानंतर रेल्वेकडून तुम्हाला तुमच्या सामानाचं तिकीट दिलं जातं. तसेच तुमच्या प्रवासी तिकीटावर एक एन्ट्री केली जाते. तुम्ही तुमच्या इच्छित ठिकाणी गेल्यानंतर तिकीट दाखवून तुमचं वाहन ताब्यात घेऊ शकता. हा पर्याय सर्वात वेगवान मानला जातो. कारण तुम्हीही तुमच्या सामानासोबत इच्छित ठिकाणी जाता. पण दुसरा पर्याय थोडा वेळखाऊ आहे.
विदेशवारी करायचं म्हंटलं तर पासपोर्ट हवाच. त्याशिवाय विदेशवारी करूच शकत नाही. पण पासपोर्ट काढताना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. सर्वात प्रथम ...
तुम्ही ट्रेनने प्रवास करत नसाल आणि तुम्हाला तुमचं वाहन दुसऱ्या ठिकाणी पोहोचवायचं असेल तर हा पर्याय वेळखाऊ आहे. यासाठी तुम्हाला पार्सल म्हणून बाइकची नोंद करावी लागेल. यासाठी तुम्हाला तुमच्या वाहनाचं तिकीट काढावं लागेल. तसेच वाहन इच्छित ठिकाणी पाठवण्यासाठी एक ते सात दिवसांपर्यंतचा अवधी लागू शकतो. रेल्वे कर्मचारी त्या वाहनाचं वजन करतात आणि त्या वजनानुसार पैसे आकरतात. काउंटरवर पैसे भरल्यानंतर तुम्हाला पार्सल पावती मिळते.
कोणती कागदपत्रं हवीत? काय काळजी घ्यावी लागते?
गाडीची मूळ कागदपत्र आणि छायाप्रत असणं आवश्यक आहे. वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वैध वाहन विमा कागदपत्र आणि आधारकार्ड किंवा लायसन्स ही कागदपत्र आवश्यक आहेत. आरसी बुक नसलेल्या इलेक्ट्रिक सायकल किंवा स्कूटर्ससाठी खरेदीची पावती किंवा बिल असणं आवश्यक आहे. दुचाकी रेल्वेतून पाठवण्यापूर्वी इंधन टाकी पूर्णपणे रिकामी असावी. जरासंही पेट्रोल टाकीत नसावं. अन्यथा दंड होऊ शकतो. इतकंच काय तर वाहनाला काही डॅमेज होऊ नये यासाठी त्याची व्यवस्थित पॅकिंग करणं गरजेचं आहे. पॅकिंगसाठी अंदाजे सहाशे रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. वाहनावर तुमचं नाव, मोबाईल नंबर, वाहन कोठून कुठे पाठवायचं आहे याची स्पष्ट नोंद असावी.





