हुश्शsss! जापानविरुद्ध कसं बसं जिंकलो, नेमकं काय झालं सामन्यात? शेवटच्या षटकात असा थरार रंगला

भारत आणि जापान यांच्यात मैत्रिपूर्ण टी20 सामना नुकताच पार पडला. या सामन्यात जापानने भारतीय संघाला विजयासाठी चांगलंच झुंजवलं. खरं तर या सामन्यात भारताच्या पदरी निसटता विजय मिळाला असं म्हणायला हरकत नाही. भारत आणि जापान यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे पाच षटकांचा करण्यात आला होता. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण भारताला या पाच षटकात फार काही धावा करता आल्या नाही. भारताने 5 षटकात 4 गडी गमवून 32 धावा केल्या आणि विजयासाठी 33 धावांचं आव्हान दिलं. खरं तर जापानसाठी हे सोपं आव्हान होतं. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली होती. अखेर हा सामना रंगतदार वळणावर आला.



विजयी धावांचा पाठलाग करताना काय घडलं?


भारताने विजयासाठी दिलेल्या 33 धावांचा पाठलाग करताना जापानची सुरूवात अडखळत झाली. पहिल्या षटकात अक्षर पटेलने अवघ्या 2 धावा देऊन एक विकेट काढली. दुसऱ्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने 1 विकेट काढली पण 8 धावा दिल्या. त्यामुळे तीन षटकात 25 धावांची गरज जापानला होती. रवि विष्णोईचं षटक टीम इंडियाला महागात पडलं. कारण या षटकात एकही विकेट मिळाली नाही, पण 10 धावा गेल्या. त्यामुळे 12 चेंडू आणि 15 धावा अशी स्थिती आली. त्यामुळे टीम इंडियाची धाकधूक वाढली. जापानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागतंय की काय? असं वाटलं. त्यानंतच चौथं षटक वॉशिंग्टन सुंदरने टाकलं आणि 7 धावा देत 1 विकेट काढली. त्यामुळे सहा चेंडूत 8 धावा अशी स्थिती आहे.



शेवटच्या षटकात काय झालं?


कर्णधार श्रेय्यस अय्यरने शेवटचं षटक अक्षर पटेलकडे सोपवलं. त्याने या षटकाचा पहिलाच चेंडू निर्धाव टाकला. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव काढली आणि 4 चेंडूत 7 धावा अशी स्थिती आली. तिसरा चेंडू टाकताना अक्षर पटेलने सलग दोन वाइ़ड टाकले आणि 4 चेंडूत 5 धावा अशी स्थिती आली. मग हा चेंडू तिसऱ्यांदा टाकताना निर्धाव गेला. चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर प्रत्येकी 1 धाव दिली आणि शेवटच्या चेंडूवर 4 धावा अशा स्थितीत सामना पोहोचला. या चेंडूवर फक्त एक धाव आणि भारताने हा सामना फक्त 2 धावांनी जिंकला.




                      
                  
Comments
Add Comment

वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी, टी20 संघाची धुरा सांभाळणार

[caption id="attachment_1073007" align="aligncenter" width="800"] सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेला 14 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेच्या

India vs New Zealand live streaming: भारत-न्यूझीलंड दुसरा वनडे सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने

IND vs NZ 2nd ODI: वेलिंग्टनमध्ये विराट कोहलीच्या रडारवर सचिन आणि पॉन्टिंगचे विक्रम, काय ते जाणून घ्या

[caption id="attachment_1072895" align="aligncenter" width="800"] विराट कोहलीची रनमशिन म्हणून ख्याती आहे. पण टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती

अंडर-19 आशिया चषकात भारताची विजयी सलामी! नेपाळचा 10 विकेट्सने धुव्वा; पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्याआधी दमदार संदेश

मस्कत : अंडर-19 आशिया चषक 2026 मध्ये भारतीय युवा संघाने शानदार विजयी सुरुवात केली आहे. ओमानमधील अल अमरात येथे झालेल्या

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माची बॅट तळपणार का? वेलिंग्टनमधील रेकॉर्ड पाहून तुम्हीही तसंच म्हणाल

[caption id="attachment_1072774" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ पाच सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या

IND vs BAN: भारतीय संघ जानेवारी महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार? दोन वर्षांचा गुंता सुटला का?

बांगलादेशमध्ये गेल्या काही वर्षात राजकीय अस्थिरता आहे. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती आहे. दरम्यानच्या काळात