Mumbai News : कोस्टल रोडवर चोरट्यांचा डल्ला! केबल कापल्याने सुरक्षा यंत्रणा विस्कळीत, पालिकेकडून तातडीने उपाययोजना सुरू

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्यावरील पथदिवे आणि सीसीटीव्ही यंत्रणेच्या केबल चोरीच्या घटनांमुळे अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत. वारंवार केबल चोरी आणि कापण्याच्या घटना घडत असल्याने काही भागातील पथदिवे बंद झाले असून 60 ते 65 सीसीटीव्ही कॅमेरेही बंद असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. ही यंत्रणा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी महापालिका आणि मुंबई पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.


मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर मार्च 2024 पासून हा मार्ग टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या मार्गावर वाहनांच्या सुरक्षिततेसाठी पथदिवे आणि निगराणीकरिता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सुरुवातीला पथदिव्यांसाठी तांब्याच्या केबलचा वापर करण्यात आला होता. मात्र, काही ठिकाणी तांब्याच्या केबल चोरीला गेल्याचे समोर आले. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी आणि एफआयआर दाखल करण्यात आले होते.



तांब्याच्या केबल चोरीला आळा घालण्यासाठी नंतर अॅल्युमिनियम केबल बसवण्यात आली. मात्र, महालक्ष्मी मंदिर, मद्रासी वाडी, मार्कडेश्वर मंदिर आणि वरळी परिसरात अॅल्युमिनियम केबलचीही चोरी आणि कापण्याचे प्रकार सुरूच राहिले. त्यामुळे महापालिकेला अनेक ठिकाणी केबलची वारंवार दुरुस्ती आणि बदली करावी लागत आहे. काही ठिकाणी दोन ते तीन वेळा केबल बदलण्यात आल्याची माहिती आहे.


या प्रकरणी एल अँड टी, एचसीसी आणि संचालन व देखभाल कंत्राटदारांच्या माध्यमातून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत सुमारे 20 ते 25 एफआयआर आणि तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच आतापर्यंत सुमारे 110 किलोमीटर लांबीच्या पॉवर केबल बदलण्यात आल्या आहेत.


केबल चोरीमुळे किनारी रस्त्यावरील प्रकाशव्यवस्थेवर परिणाम झाला असून वरळी आणि महालक्ष्मी मंदिराजवळील काही भागांमध्ये अंधाराचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय सीसीटीव्हीसाठी वापरण्यात येणाऱ्या फायबर कम्युनिकेशन केबल चोरीला गेल्याने किंवा कापल्याने 60 ते 65 कॅमेरे बंद झाले आहेत. या सर्व केबल्स पुन्हा बसवून पथदिवे आणि सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मुंबई पोलीस प्रशासनासोबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही काम केले जात आहे.



Comments
Add Comment

Ganesh Visarjan 2026: 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'; राज्यात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात

बाप्पाला निरोप देण्यासाठी गुलालाची उधळण, फुलांचा वर्षाव आणि ढोल-ताशांचा कडकडाट यामुळे वातावरण भारावून गेले आहे.

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीसाठी मुंबई महापालिकेची जय्यत तयारी; 25 हजारांहून अधिक कर्मचारी तैनात

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने व्यापक तयारी

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ भागांत 24 तास पाणीपुरवठा विस्कळीत, 7 दिवस कमी दाबाने पाणी

मुंबई : एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी तुर्भे निम्नस्तरीय जलाशय ते तुर्भे

Mira Bhayandar News: भटक्या श्वानांना खाद्य दिल्यास दंड; महापालिकेच्या निर्णयावर पशुसंवर्धन विभागाने मागवला रिपोर्ट

मीरा- भायंदर: मीरा- भायंदर महानगर पालिका क्षेत्रामधील श्वानप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. मीरा- भायंदर

Mumbai News: विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी तज्ज्ञ समितीच्या स्थापनेची मागणी, कोण होणार अध्यक्ष?

मुंबई: महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका अधिक पारदर्शक, सुलभ

Mumbai Ganpati Visarjan: अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज, एका क्लिकवर पाहा कृत्रिम तलावांची यादी

मुंबई: अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. मुंबई महापालिकेकडून