Mumbai Port : मुंबई बंदरावर ‘बार्ज रोल-ऑफ’चा यशस्वी प्रयोग; 1,452 मेट्रिक टन अवजड मालाची सुरक्षित हाताळणी

मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाने अत्यंत अवजड आणि मोठ्या आकाराच्या औद्योगिक उपकरणांची यशस्वी हाताळणी करत नवी कामगिरी नोंदवली आहे. 24 सप्टेंबर 2026 रोजी विशेष ‘बार्ज रोल-ऑफ’ पद्धतीचा वापर करून 718, 502 आणि 232 मेट्रिक टन वजनाची तीन मोठी मालवाहू पॅकेजेस सुरक्षितपणे किनाऱ्यावर उतरवण्यात आली. (Mumbai Port)


गुजरातमधील दाहेज येथून बार्जद्वारे हे तीन पॅकेजेस मुंबई बंदरात आणण्यात आले होते. हे सामान संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनीकडे निर्यात केले जाणार आहे. पुढील जहाज उपलब्ध होईपर्यंत हा माल मुंबई बंदरात साठवून ठेवण्यात येणार आहे.



या मालामध्ये 718 मेट्रिक टन वजनाचे Process Gas Cooler (PG Cooler), 502 मेट्रिक टन वजनाचे Riser & Downcomer आणि 232 मेट्रिक टन वजनाचे Steam Drum यांचा समावेश आहे. मोठे आकार आणि प्रचंड वजनामुळे पारंपरिक जहाजावरील किंवा किनाऱ्यावरील क्रेनच्या मदतीने हा माल उतरवणे शक्य नव्हते. (Mumbai Port)


त्यामुळे मुंबई बंदर प्राधिकरणाने विशेष बार्ज रोल-ऑफ पद्धतीचा वापर केला. या प्रक्रियेत बार्ज किनाऱ्याला काटकोनात उभी करून हायड्रोलिक पुलर असलेले ट्रेलर्स मालाच्या खाली नेण्यात आले. त्यानंतर हायड्रोलिक प्रणालीच्या मदतीने ही अवजड पॅकेजेस ट्रेलर्सवर सुरक्षितपणे उचलून चाकांवरून थेट किनाऱ्यावर आणण्यात आली. (Mumbai Port)



मुंबई बंदराच्या लॉक गेटमधील स्थिर पाण्यामुळे या प्रक्रियेदरम्यान बार्ज आणि किनाऱ्यामध्ये आवश्यक संतुलन राखणे शक्य झाले. त्यामुळे संपूर्ण हाताळणी सुरक्षितपणे पूर्ण करण्यात आली.


या कामगिरीमुळे अत्यंत अवजड औद्योगिक उपकरणांची वाहतूक आणि निर्यात करण्यासाठी मुंबई बंदराची क्षमता अधोरेखित झाली आहे. तसेच भारतात उत्पादित औद्योगिक उपकरणांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी बंदर सुविधा, किनारपट्टीवरील जलवाहतूक आणि प्रकल्प रसद व्यवस्थापनाचे महत्त्वही स्पष्ट झाले आहे. (Mumbai Port)

Comments
Add Comment

महाराष्ट्रात ‘SIR’ बाबत दावे- हरकतींसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई: विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेत महाराष्ट्रातील मतदारांना दावे आणि हरकती दाखल

Central Railway : सणासुदीच्या गर्दीसाठी मध्य रेल्वे सज्ज; 418 विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवाच्या काळात रेल्वे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य

Central Railway : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; सेवांमध्ये बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे

Mumbai News: सोनं तस्करीची भन्नाट शक्कल! खाद्यपदार्थांच्या पाकिटांत लपवलं 9.40 किलो सोनं; तिघे अटकेत

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (Directorate of Revenue Intelligence- DRI) मुंबई विभागाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज

DCM Eknath Shinde News: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई: “संकटाच्या प्रत्येक काळात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. आताही दुष्काळी

रोजगार महाकुंभाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २९ सप्टेंबरला उद्घाटन, राज्यभरात विविध ठिकाणी आयोजन; ‘लाडक्या बहिणीं’साठी स्वतंत्र रोजगार मेळावा

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या २९ सप्टेंबरला ‘पंडित दीनदयाळ