Sunday, September 27, 2026

अजून काही संपलं नाही...! वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेपूर्वी रोहित शर्माचं मोठं विधान, मनात नेमकं काय आहे सुरू?

अजून काही संपलं नाही...! वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेपूर्वी रोहित शर्माचं मोठं विधान, मनात नेमकं काय आहे सुरू?
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी टीम इंडियाची मोर्चेबांधणी सुरू आहे. यासाठी भारतीय संघात खेळाडूंची चाचपणी सुरू आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली या सारखे दिग्गज खेळाडू संघात असतील की नाही याबाबतही पेच आहे. त्यातल्या त्यात रोहित शर्माचं संघात असण्याबाबत जास्तच गोंधळ आहे. गेल्या काही दिवसांपासून येत असलेल्या बातम्या पाहता असंच म्हणावं लागेल. रोहित शर्माने टी20 आणि कसोटी संघातून निवृत्ती घेतली आहे. आता फक्त वनडे फॉर्मेटवर लक्ष केंद्रीत केलं असून वर्ल्डकप 2027 स्पर्धा खेळण्याची इच्छा आहे. वनडे वर्ल्डकप संघात असेल की नाही? याबाबत चर्चा सुरू असताना हिटमॅन रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी रोहित शर्माने स्पष्ट केलं की, क्रिकेटमध्ये अजून बरंच काही गाठायचं आहे. जियोस्टारशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, मला करायचे असलेले काम संपले आहे, हा विचार माझ्या मनात कधीच येणार नाही. रोहित शर्मा पुढे म्हणाला की, 'जोपर्यंत तुम्ही खेळत आहात, तोपर्यंत पुढे पाहण्यासारखं काहीतरी नेहमीच असतं. मी विश्वचषकाची आणि माझ्यासाठी पुढे काय आहे हे पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.' आयसीसी स्पर्धेत नियमित मालिकांपेक्षा वेगळे आव्हान असतं. वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आणि वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्यासाठी तयारी आणि मानसिकतेमध्ये बदल आवश्यक असतो, असंही रोहित शर्मा याने सांगितलं. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आणि जेतेपदाचं स्वप्न भंगलं. आता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोहित शर्मा 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेची आतुरतेने वाट पाहात आहे, असं दिसत आहे. 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धा ऑक्टोबर नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माकडे स्वत:ला सिद्ध करण्याची पुन्हा एकदा संधी आहे. लॉर्ड्सवर शतकी खेळी केल्यानंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. आता त्याचा फॉर्म या मालिकेत कसा यावर बरंच काही ठरणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचं त्याच्या खेळीकडे लक्ष लागून आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >