आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध ठिकाणांसाठी 162 अतिरिक्त विशेष गाड्यांची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या उत्सव विशेष गाड्यांची एकूण संख्या 580 झाली आहे.
त्याचा तपशील खालीलप्रमाणे:
(1) लोकमान्य टिळक टर्मिनस - समस्तीपुर - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाड्या
गाडी क्रमांक 01043 साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी दिनांक 13 ऑक्टोबर 2026 ते दिनांक 17 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 12.15 वाजता सुटेल आणि समस्तीपुर येथे दुसऱ्या दिवशी 23.45 वाजता पोहोचेल. (6 सेवा)
गाडी क्रमांक 01044 साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी दिनांक 15 ऑक्टोबर 2026 ते दिनांक 19 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दर गुरुवारी समस्तीपुर येथून 03.00 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 15.45 वाजता पोहोचेल. (6 सेवा)
गाडीचे थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपुर, मदन महल, कटनी, मैहर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, दीन दयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर, पाटलिपुत्र, सोनपुर, हाजीपुर आणि मुजफ्फरपुर.
गाडीची संरचना: 2 वातानुकूलित द्वितीय, 18 वातानुकूलित तृतीय आणि 2 जनरेटर व्हॅन्स.
(2) लोकमान्य टिळक टर्मिनस - दानापुर - लोकमान्य टिळक टर्मिनस दैनंदिन विशेष गाड्या सोडल्या जातील (88 सेवा)
गाडी क्रमांक 01143 दैनंदिन विशेष गाडी दिनांक ०९ऑक्टोबर 2026 ते दिनांक 21 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दररोज लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 10.30 वाजता सुटेल आणि दानापुर येथे दुसऱ्या दिवशी 21.50 वाजता पोहोचेल. (44 सेवा)
गाडी क्रमांक 01144 दैनंदिन विशेष गाडी दिनांक १० ऑक्टोबर 2026 ते दिनांक 22 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दररोज दानापूर येथून 00.10 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 06.50 वाजता पोहोचेल. (44 सेवा)
गाडीचे थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी (केवळ गाडी क्रमांक 01144 साठी), नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपुर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी, दीन दयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
गाडीची संरचना: 4 वातानुकूलित तृतीय, 11 शयनयान, 5 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय असनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
(3) लोकमान्य टिळक टर्मिनस - संतरागाछी - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाड्या (8 सेवा)
गाडी क्रमांक 01107 साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी दिनांक 06 ऑक्टोबर 2026 ते दिनांक 27 ऑक्टोबर 2026 या कालावधीत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 20.20 वाजता सुटेल आणि संतरागाछी येथे तिसऱ्या दिवशी 05.00 वाजता पोहोचेल.(4 सेवा)
गाडी क्रमांक 01108 साप्ताहिक एसी विशेष गाडी दिनांक 08 ऑक्टोबर 2026 ते दिनांक 29 ऑक्टोबर 2026 या कालावधीत दर गुरुवारी संतरागाछी येथून 11.00 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 21.30 वाजता पोहोचेल. (4 सेवा)
गाडीचे थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी (गाडी क्रमांक 01108 साठी), नाशिक रोड, भुसावळ, मलकापुर, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपुर, बिलासपुर, रायगढ, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपुर, टाटानगर आणि खडगपुर.
गाडीची संरचना: 1 वातानुकूलित प्रथम श्रेणी, 3 वातानुकूलित द्वितीय, 15 वातानुकूलित तृतीय, 1 पॅन्ट्री कार आणि 2 जनरेटर व्हॅन्स.
सह्याद्री अतिथिगृहावर संसदीय संकुल विकास परियोजनेचे उद्घाटन मुंबई : संसदीय संकुल विकास परियोजनेअंतर्गत तयार होणाऱ्या कार्ययोजना राबविण्यास राज्य ...
(4) लोकमान्य टिळक टर्मिनस - बनारस - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाड्या (14 सेवा)
गाडी क्रमांक 05168 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 18 ऑक्टोबर 2026 ते दिनांक 29 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दर रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 18.10 वाजता सुटेल आणि बनारस येथे तिसऱ्या दिवशी 00.50 वाजता पोहोचेल. (7 सेवा)
गाडी क्रमांक 05167 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 17 ऑक्टोबर 2026 ते दिनांक 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दर शनिवारी बनारस येथून 09.50 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 16.50 वाजता पोहोचेल. (7 सेवा)
गाडीचे थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, बुरहानपुर, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, मैहर, सतना, मानिकपुर, प्रयागराज छिवकी आणि वाराणसी.
गाडीची संरचना: 1 वातानुकूलित प्रथम श्रेणी, 2 वातानुकूलित द्वितीय, 4 वातानुकूलित तृतीय, 2 वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, 6 शयनयान, 5 सामान्य द्वितीय श्रेणी, 1 द्वितीय असनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन.
(5) खडकी – हजरत निजामुद्दीन – खडकी द्वि-साप्ताहिक वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी (28 सेवा)
गाडी क्रमांक 01483 ही द्वि-साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी दिनांक 06 ऑक्टोबर 2026 ते दिनांक 20 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी खडकी येथून 17.30 वाजता सुटेल आणि हजरत निजामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी १८.१० वाजता पोहोचेल. (14 सेवा)
गाडी क्रमांक 01484 ही द्वि-साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी दिनांक 07 ऑक्टोबर 2026 ते दिनांक 21 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दर बुधवारी आणि शनिवारी हजरत निजामुद्दीन येथून 22.10 वाजता सुटेल आणि खडकी येथे दुसऱ्या दिवशी 22.15 वाजता पोहोचेल.(14 सेवा)
गाडीचे थांबे: लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा, रतलाम, भवानी मंडी, कोटा, सवाई माधोपुर आणि मथुरा जंक्शन.
गाडीची संरचना: 6 वातानुकूलित द्वितीय, 10 वातानुकूलित तृतीय आणि 2 जनरेटर व्हॅन्स.
(6) खडकी – सांगानेर – खडकी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी (12 सेवा)
गाडी क्रमांक 01411 ही साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 15 ऑक्टोबर 2026 ते दिनांक 19 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दर गुरुवारी खडकी येथून 09.45 वाजता सुटेल आणि सांगानेर येथे दुसऱ्या दिवशी 06.45 वाजता पोहोचेल. (6सेवा)
गाडी क्रमांक 01412 ही साप्ताहिक विशेष गाडी दिनांक १६ ऑक्टोबर 2026 ते दिनांक 20 नोव्हेंबर 2026 या कालावधीत दर शुक्रवारी सांगानेर येथून 11.35 वाजता सुटेल आणि खडकी येथे दुसऱ्या दिवशी 09.30 वाजता पोहोचेल. (6 सेवा)
गाडीचे थांबे: लोणावळा, कल्याण, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, सुरत, अंकलेश्वर, वडोदरा, रतलाम, कोटा आणि सवाई माधोपूर.
गाडीची संरचना: 1 वातानुकूलित द्वितीय, 3 वातानुकूलित तृतीय, 6 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी, 2 द्वितीय असनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन.
गाडी क्रमांक 01043, गाडी क्रमांक 01143, गाडी क्रमांक 01107, गाडी क्रमांक 05168, गाडी क्रमांक 01483 आणि गाडी क्रमांक 01411 या विशेष गाड्यांचे आरक्षण दिनांक 2 ऑक्टोबर 2026 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. तर अनारक्षित डब्यांचे तिकीट बुकिंग सामान्य दरांसह युटीएस प्रणालीद्वारे करता येईल. तिकीट आरक्षणासाठी प्रवासी 'रेलवन' ॲपचाही वापर करू शकतात. या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीइएस ॲप डाउनलोड करा.