पाऊस संपला, उकाडा वाढणार! मुंबईतून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी; IMD ची घोषणा

यंदा अत्यल्प पावसामुळे उकाडा आणि गर्मीने नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. अशातच आज (३ ऑक्टोबर २०२६) भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मान्सून हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या काही भागांतून परतल्याची अधिकृत माहिती दिली आहे. यामुळे आता राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील २०२६च्या मान्सून हंगामाची सांगता झाल्याचे स्पष्ट होते. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनच्या उर्वरित माघारीसाठी सध्या देशातील वातावरण हे अनुकूल बनले आहे. ३ ऑक्टोबर रोजी नैऋत्य मोसमी वारे मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांतून पूर्णपणे माघारी फिरले असल्याचे माहिती हवामान विभागाच्या शास्त्रज्ञानी दिली.


पुढील २ ते ३ दिवसांत मान्सूनची माघार अधिक वेगाने होणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ, बिहार आणि झारखंडचा भाहुतांश भाग, तसेच मध्य महाराष्ट्र, छत्तीसगढ, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकाच्या काही भागांतून मोसमी वारे मागे फिरण्यासाठी आवश्यक पोषक वातावरण तयार झाले आहे. या प्रदेशांमधील काही भागांमध्ये सध्या अतिशय हलक्या आणि तुरळक स्वरूपाचा पाऊस नोंदवला जात आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास विदर्भात ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर या संपूर्ण कालावधीत पावसाची कोणतीही शक्यता नसून हवामान पूर्णपणे कोरडे राहणार असल्याचे सांगितले आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील कोरड्या वातावरणाचा फटका हा पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम या जिल्ह्यांना बसणार आहे. विदर्भात आधीपासूनच सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद असल्याने या सात दिवसांत विदर्भातील कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही. अमरावतीमध्ये ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वाधिक म्हणजे ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले तर सर्वात कमी तापमानाची नोंद वाशिम येथे झाली आहे. नैऋत्य मान्सून परतल्यामुळे मुंबई शहरातील कमाल तापमान हे ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Pankaj Bhoyar : सीजेपीच्या आंदोलनात असामाजिक घटकांची घुसखोरी ?

- संशयितांचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती मुंबई : मुख्य निवडणूक

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘डीपीसी’चा निधी गोठवला; रस्ते, पायाभूत सुविधांच्या कामांना ब्रेक

जलसंधारण, टँकर आणि चारा छावण्यांसाठी निधी वळवणार मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर

Dhule Crime News : धुळे हादरले ! आधी महिलेला ब्लॅकमेल केलं, नंतर संतापजनक कृत्य... ; तीन नराधम ताब्यात

Dhule Crime News : धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या (Azad Nagar Police Station) हद्दीत महिलेला धमकावत आणि ब्लॅकमेल करत तिच्यावर

Drowning Incident : अमरावतीत दुर्दैवी घटना; रत्नापूर तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

अमरावती: रायगड येथील दुर्घटनेची बातमी ताजी असतानाच अमरावतीमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. शहरात

Nitesh Rane News: महाराष्ट्राच्या 877 किमी किनारपट्टीचा एकात्मिक विकास साधणार, मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मुंबई: महाराष्ट्राची ८७७ किलोमीटर लांबीची किनारपट्टी, बंदरांचे विस्तृत जाळे आणि मजबूत औद्योगिक व उत्पादन

'भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र'ला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पोस्ट

मुंबई: मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद बातमी आहे. अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसाच्या पुर्वसंध्येला केंद्र