बैठकीत ‘Trigger-1’ अंतर्गत अवर्षण परिस्थितीचा आढावा घेताना विभागातील विविध तलाव व जलाशयांची संख्या, कोरडे पडलेले तलाव तसेच गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या पर्जन्यमानाची स्थिती याबाबत मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. सध्या विभाग ‘Trigger-1’ मध्ये असल्याने उपलब्ध जलसाठ्यांचे संवर्धन करण्यासोबतच पाणीसाठवण क्षमता वाढविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. तलावांमधील गाळ काढल्यास पाणीसाठवण क्षमता वाढण्यास मदत होणार असल्याने तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
- १ हजार ३०७ पैकी फक्त ८२ प्रस्ताव मंजूर; दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना मत्स्यव्यवसायमंत्री संतापले वाशिम : मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत सादर ...
अवर्षणामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाणी उपलब्धता, आवश्यक उपाययोजना तसेच दुष्काळी परिस्थितीचा फटका बसलेल्या मच्छीमार बांधवांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याबाबतही मंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या. ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’चे जास्तीत जास्त कॅम्प आयोजित करून ही योजना तळागाळातील मच्छीमार बांधवांपर्यंत पोहोचवावी आणि पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असेही मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.