Oppo F35 सिरीजची भारतात किंमत किती?
6 GB RAM आणि 128 GB स्टोरेज असलेल्या Oppo F35 5G ची किंमत भारतात 38,999 आहे तर 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 42,999 रुपये आहे. तर Oppo F35 Pro 5G या मॉडेलमधील 6 GB RAM आणि 128 GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 45,999 पासून सुरु होते. यातील 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत ही 49,999 आहे तर 8 GB RAM आणि 256 GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 54,999 आहे.
मुंबई: जर तुम्ही नवा मोबाईल घेण्याच्या विचारात असाल तर, थांबा... Vivo कंपनीकडून V सीरीजमधील एक नवा कोरा मोबाईल लाँच करण्यात येत आहे. त्यामुळे जर तुम्ही दसरा ...
11 ऑक्टोबर पासून हे मोबाईल फोन्सवर रिटेल दुकानांमध्ये तसेच OPPO च्या भारतातील ऑनलाईन दुकानांमध्ये आणि Flipkart, Amazon वर सेल सुरु होणार आहे. OPPO F35 5G मॉडेल वेव्ह ब्लू, टायटॅनियम ग्रे आणि मिस्ट पिंक; तर F35 Pro 5G सनराईज ऑरेंज, ट्वायलाइट ब्राउन आणि वेव्ह ब्लू रंगांमध्ये उपलब्ध आहे. या फोन्समध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे, तर OPPO F35 Pro 5G मध्ये फ्रंट आणि रिअर अशा दोन्ही कॅमेऱ्यांमधून 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट मिळतो.
F35 सिरीजमध्ये 8,000 mAh ची बॅटरी देण्यात आली असून, ती 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे स्मार्टफोन्स धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंगसह येतात. दोन्ही मॉडेल्स Android 17 वर आधारित ColorOS 17 वर चालतात आणि विविध रॅम (RAM) व स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. OPPO F35 Pro 5G मध्ये 256 GB पर्यंतचे अंतर्गत स्टोरेज मिळते.