Bhandup: भांडुप संकुलातील नवीन जलशुध्दीकरणाच्या बांधकामांमध्ये ३३४ झाडे बाधित

या प्रकल्प कामाला सुरुवात करता यावी तीन टप्प्यात प्रत्येक २५ बाधित झाडांना क कापण्यास आणि पुनर्रोपित करण्यास परवानगी दिल्यानंतर आता यातील बाधित ३३४ बाधित झाडांपैकी १८४ झाडे कापण्यास वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी देण्यात आली.

पर्यायी ४७२० वृक्षांचे रोप आता बदलापूरमधील वन विभागाच्या जागेत करणार


वृक्ष प्राधिकरणाने दिली मंजुरी


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


एस' विभागातील भांडूप संकुल, भांडूप (प.), मुंबई येथील प्रस्तावित नविन २००० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्प कामाला सुरुवात करता यावी तीन टप्प्यात प्रत्येक २५ बाधित झाडांना क कापण्यास आणि पुनर्रोपित करण्यास परवानगी दिल्यानंतर आता यातील बाधित ३३४ बाधित झाडांपैकी १८४ झाडे कापण्यास वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी देण्यात आली.


मुंबईत महापालिकेच्यावतीने धरणांमधील पाण्यावर भांडुप संकुलातील शुध्दीकरण करण्यात येत असून याठिकाणी अजून २००० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. या जलशुध्दीकरण केंद्राच्या बांधकामामध्ये ३३४ झाडे बाधित होत असून त्यामध्ये १८४ वृक्ष कापण्यास व १५० वृक्ष पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव वृृक्ष प्राधिकरणापुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.


महापालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्प कामाचे कार्यकारी अभियंता यांनी मार्च २०२६ रोजी या जागेवरील २५ झाडे तातडीने काढण्याची आवश्यकता असल्याने आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या परवानगी कापणे आणि पुनर्रोपित करण्यास परवानगी मिळवली होती. त्यानुसार यातील एक झाड मृत असल्याने १२ झाडे कापली आणि १२ झाडे पुनर्रोपित केली होती. त्यानंतर (फेज-२) त्या जागेवरील २५ तातडीने काढणे आवश्यक असल्याने एकूण बाधीत २५ वृक्षांपैकी सदरची फक्त २१ वृक्ष कापणे पुनर्रोपित करण्यास महानगरपालिका आयुक्त यांनी २५ मार्च रोजी परवानगी दिली. त्यानंतर फेज-३मध्ये या जागेवरील २४ तातडीने काढणे आवश्यक असल्याने एकूण बाधीत २४ वृक्षांपैकी सदरची फक्त ०९ वृक्ष कापणे व १५ पुनर्रोषित करण्यास महानगरपालिका आयुक्तांनी ९ एप्रिल २०२६ रोजी यापूर्वीच परवानगी देण्यात आली आहे.


त्यानंतर आता येथील १८४ वृक्ष कापणे, १५० वृक्ष पुनर्रोपित करणेकरीता करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या बदल्यात ४७२० नवी झाडे लावण्यात येणार आहे. ही सर्व झाडे ठाणे विभागातील बदलापूरमधील वन विभागाच्या जागेवर लावण्यात येणार आहे. सहा हेक्टर जागेत हि सर्व झाडे लावण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

CSR for Child Nutrition : गरीब वस्त्यांमधील मुलांपर्यंत पोषण पोहोचविण्यासाठी सीएसआर भागीदारीचा वापर गरजेचा

प्रशासनातील अनावश्यक टप्पे कमी करणे ‘बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग’ची आवश्यकता मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

Central Railway Project : मध्य रेल्वेच्या ५ आणि ६व्या लाईनच्या प्रकल्प कामाला गती

माटुंगा वर्कशॉप परिसरातील ४२ झाडे बाधित वृक्ष प्राधिकरणाची परवानगी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मध्य रेल्वेच्या ५

Guinness World Records: ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळा’ने रचला इतिहास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’सर्टिफिकेट प्रदान

मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल

Smriti Mandhana: मोठी बातमी! स्मृती मंधाना महिला संघाची कर्णधार

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि माजी विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाची

NMIA Bus Service: आनंदाची बातमी! नवी मुंबई विमानतळासाठी ST बससेवेची सुरूवात, कशी असेल सुविधा?

मुंबई: नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतून नवी मुंबई

Mumbai Local Megablock: कसारा- आसनगाव मार्गिकेवर पुन्हा विशेष ब्लॉक, कसं असेल लोकलचं वेळापत्रक; जाणून घ्या एका क्लिकवर

ठाणे: मध्य रेल्वेवरील आसनगाव- कसारा मार्गावर तिसरी मार्गिका आणि कसारा यार्ड विस्तारीकरणासाठी विशेष ट्रॉफिक आणि