Central Railway Project : मध्य रेल्वेच्या ५ आणि ६व्या लाईनच्या प्रकल्प कामाला गती

या जागेवर एकूण ४२ वृक्ष अस्तित्वात आहेत. या जागेवरील जागेवरील ४२ (बेचाळीस) वृक्ष नियोजित माटुंगा वर्कशॉपच्या बांधकामात उत्खननात बाधित होत आहेत.

माटुंगा वर्कशॉप परिसरातील ४२ झाडे बाधित


वृक्ष प्राधिकरणाची परवानगी


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मध्य रेल्वेच्या ५ वी व ६ वी लाईन प्रकल्प अंतर्गत, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते कुर्ला रेल्वेच्या मधील माटुंगा वर्कशॉपच्या प्रस्तावित बांधकामात येणारी झाडे काढण्यास वृक्ष प्राधिकरणाची परवानगी मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गत या दोन्ही मार्गाच्या कामांमध्ये ४२ झाडे बाधित होत असून यामध्ये २९ झाडे कापली जाणार आहेत. तर १३ झाडे पुनर्रोपित केली जाणार आहे.


महापालिकेच्या 'जी/उत्तर' विभागातील, मध्य रेल्वे ५ वी व ६ वी लाईन प्रकल्प अंतर्गत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते कुर्ला रेल्वेच्या मधील माटुंगा वर्कशॉपच्या प्रस्तावित बांधकामात येणारी २९ (एकोणतीस) वृक्ष कापण्यास व १३ (तेरा) वृक्ष पुनर्रोपित करण्यास अशी एकूण ४२ (बेचाळीस) वृक्ष काढण्याची मध्य रेल्वेच्यावतीने महापालिका वृक्ष प्राधिकरणाला सादर करण्यात आली होती. याबाबतचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीपर्यंत परवानगीसाठी सादर करण्यात आला होता. या जागेवर एकूण ४२ वृक्ष अस्तित्वात आहेत. या जागेवरील जागेवरील ४२ (बेचाळीस) वृक्ष नियोजित माटुंगा वर्कशॉपच्या बांधकामात उत्खननात बाधित होत आहेत.


या २९ वृक्ष कापण्याच्या व १३ वृक्ष पुनर्रोपित करण्याच्या बदल्यात नवीन लावण्यात येणारी ८९६ वृक्ष, तोडण्यात आल्याच्या दिनांकापासुन १५ दिवसांत लावण्यात येणार आहेत व या नवीन लावण्यात येणा-या झाडांची उंची ०६ फुटापेक्षा कमी नसेल तसेच नव्याने लागवड करण्यात येणारी वृक्ष स्थानिक प्रजातीची असतील नवीन लावण्यात येणारी व पुनर्रापित करण्यात येणारी वृक्ष लोकमान्य टिळक टर्मिनल रेल्वे स्टेशन यार्ड येथील भूभागावर लावण्यात येणार आहेत, असे हमीपत्र रेल्वेने दिले आहे. लोकमान्य टिळक टर्मिनल रेल्वे स्टेशन यार्ड या उपलब्ध जागेवर २००० चौरस मीटर एवढ्या क्षेत्रावर पारंपारिक पध्दतीने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. नवीन लावण्यात आलेल्या झाडांचे ०७ वर्षापर्यंत जतन व संवर्धन संबंधित मध्य रेल्वेच्या वरीष्ठ सेक्शन अभियंता (उद्यान विद्या)यांच्यामार्फत करण्यात येईल, असे त्यांनी हमीपत्रात नमुद केले आहे. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.


भरपाई वृक्षारोपणास प्रस्तावित झाडांच्या प्रजाती


नागकेशर, काचंन, कदंब, निम, मोहगनी, बहावा, सिता अशोक, बकुळ, निंबोळी, तामण. पारिजातक, राय आवळा, चिंच, करंज, चाफा / सोनचाफा


इत्यादी झाडे जागेचा उपलब्धतेनुसार व निकषानुसार लावण्यात येतील

Comments
Add Comment

CSR for Child Nutrition : गरीब वस्त्यांमधील मुलांपर्यंत पोषण पोहोचविण्यासाठी सीएसआर भागीदारीचा वापर गरजेचा

प्रशासनातील अनावश्यक टप्पे कमी करणे ‘बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग’ची आवश्यकता मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

Bhandup: भांडुप संकुलातील नवीन जलशुध्दीकरणाच्या बांधकामांमध्ये ३३४ झाडे बाधित

पर्यायी ४७२० वृक्षांचे रोप आता बदलापूरमधील वन विभागाच्या जागेत करणार वृक्ष प्राधिकरणाने दिली मंजुरी मुंबई

Guinness World Records: ‘महा गणेशमूर्ती कार्यशाळा’ने रचला इतिहास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’सर्टिफिकेट प्रदान

मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल

Smriti Mandhana: मोठी बातमी! स्मृती मंधाना महिला संघाची कर्णधार

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि माजी विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाची

NMIA Bus Service: आनंदाची बातमी! नवी मुंबई विमानतळासाठी ST बससेवेची सुरूवात, कशी असेल सुविधा?

मुंबई: नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतून नवी मुंबई

Mumbai Local Megablock: कसारा- आसनगाव मार्गिकेवर पुन्हा विशेष ब्लॉक, कसं असेल लोकलचं वेळापत्रक; जाणून घ्या एका क्लिकवर

ठाणे: मध्य रेल्वेवरील आसनगाव- कसारा मार्गावर तिसरी मार्गिका आणि कसारा यार्ड विस्तारीकरणासाठी विशेष ट्रॉफिक आणि