मंत्री नितेश राणे यांची आंध्रचे बंदरे मंत्री जनार्दन रेड्डी यांच्यासोबत बैठक; बंदरांच्या माध्यमातून औद्योगिकीकरणाला चालना देण्याच्या उपक्रमांबाबत चर्चा

महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेशच्या सागरी आणि बंदरकेंद्रित विकास परिसंस्थेचा अभ्यास करण्यासाठी सुरु असलेल्या अभ्यास दौऱ्यादरम्यान आंध्र प्रदेश सरकारचे पायाभूत सुविधा व गुंतवणूक तसेच रस्ते व इमारती व बंदरे विभागाचे मंत्री बी. सी. जनार्दन रेड्डी यांच्यासोबत सविस्तर बैठक घेतली. या बैठकीत आंध्र प्रदेशातील ग्रीनफिल्ड बंदरांचा विकास, जहाजबांधणी व जहाज दुरुस्ती क्लस्टर्स, आधुनिक मत्स्यबंदरांचा विकास, अंतर्देशीय जलमार्ग, वॉटर मेट्रो, किनारी पर्यटन, बंदरांची कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा तसेच बंदरांच्या माध्यमातून औद्योगिकीकरणाला चालना देण्याच्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले.


बंदरे, उद्योग, मत्स्यव्यवसाय, लॉजिस्टिक्स, जहाजबांधणी, कनेक्टिव्हिटी आणि किनारी अर्थव्यवस्था यांना एकमेकांशी जोडणाऱ्या एकात्मिक सागरी विकास मॉडेलवर बैठकीत चर्चा झाली. बंदर विकासासोबतच संबंधित उद्योग, रोजगारनिर्मिती, मत्स्यव्यवसाय आणि किनारी भागाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी घेण्यात आली.



महाराष्ट्रातील सागरी परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आंध्र प्रदेशच्या विकास मॉडेलमधील उपयुक्त बाबींचा अभ्यास करण्यावर यावेळी भर देण्यात आला. बंदर विकासासोबत कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक्स, जहाजबांधणी, मत्स्यव्यवसाय आणि किनारी पर्यटन यांची सांगड घालण्याच्या दृष्टीने आंध्र प्रदेशातील अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.


यावेळी आंध्र प्रदेश मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रवीण आदित्य, IAS, मुख्य अभियंता श्री. राघव राव, पोर्ट ऑफिसर कॅप्टन धर्मा, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे CEO श्री. प्रदीप पी., मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन प्रवीण खरा, कार्यकारी अभियंता श्री. मनीष मेटकर यांच्यासह दोन्ही राज्यांतील वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

आंध्र प्रदेशच्या मत्स्यव्यवसायातील आधुनिक प्रयोगांचा महाराष्ट्रात उपयोग करणार : मंत्री नितेश राणे

आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यादरम्यान आज मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आंध्र

Nashik : अंबडमधील पिवळ्या रसायनमिश्रित पाण्याने खळबळ ! गरज भासल्यास संबंधित कंपन्या बंद करण्याची कारवाई करावी, मंत्री गिरीश महाजनांचे निर्देश

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून प्रक्रिया न करता दूषित सांडपाणी सोडले जात असल्याच्या तक्रारींची

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राची केंद्रीय पथकांकडून पाहणी सुरू; ११ सदस्यांचे पथक राज्यात दाखल

मुंबई : खरीप हंगामातील दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे ११

Olympics 2036 यजमानपदासाठी भारताची दावेदारी मजबूत; सहा देशांशी होणार कडवी टक्कर!

[caption id="attachment_1065067" align="aligncenter" width="800"] ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताची कामगिरी हवी तशी झालेली नाही. पण गेल्या काही

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांची गर्दी ! कुंभमेळ्यात भाविकांची पायपीट होणार कमी, पोलिसांचे विशेष नियोजन

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक दाखल होण्याची

MLC Election: विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत फूट, परस्परांविरोधात अर्ज दाखल

मुंबई: विधान परिषदेच्या पाच जागा एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांतच महाविकास आघाडीतील