Nana Patekar passes away : नटसम्राट हरपला...! नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार, पंतप्रधान मोदींसह विविध क्षेत्रांतून श्रद्धांजली

दोना पावला येथील त्यांच्या निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चित्रपट, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून मोठा शोक व्यक्त केला जात आहे.

गोवा : भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar)  (वय ७५) यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर २०२६) पहाटे गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दोना पावला येथील त्यांच्या निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चित्रपट, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून मोठा शोक व्यक्त केला जात आहे.



पहाटे घडलेला घटनाक्रम आणि डॉक्टरांचा प्रयत्न


मणिपाल रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांनी रात्री २:३० वाजताच्या सुमारास अस्वस्थ वाटत असल्याचा संदेश एका मित्राला पाठवला होता. मात्र, रात्र असल्याने मित्राला तो संदेश वेळेत पाहता आला नाही. पहाटे ४ च्या सुमारास मित्राने फोन करून त्यांच्या घरी धाव घेतली असता नाना पाटेकर यांना प्रचंड घाम आला होता आणि त्यांची प्रकृती ढासळली होती. तातडीने रुग्णवाहिका बोलावून वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर प्रथमोपचार व सीपीआर (हृदय संजीवनी) सुरू केला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर सुमारे ४५ मिनिटे डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु सकाळी ५:२० च्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्यांचा मृतदेह गोवा मेडिकल कॉलेज येथे पाठवण्यात आला आहे.



महाराष्ट्रातर्फे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट आणि हिंदी सिनेमातील नाना पाटेकर यांच्या अद्वितीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली.



पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुःखाश्रू अन् श्रद्धांजली




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. "नाना पाटेकर यांच्यासारखी तीव्रता, वेगळेपण आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व फार कमी कलाकारांकडे पाहायला मिळते. त्यांनी प्रत्येक भूमिकेत स्वतःची नवनिर्मिती आणली. त्यांची स्पष्टवक्तेपणाची शैली आणि सामाजिक विषयांवरील मते नेहमीच वाखाणण्याजोगी होती. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे," अशा शब्दांत पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावूक प्रतिक्रिया




महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहताना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. "नाना केवळ एक महान अभिनेते नव्हते, तर एक संवेदनशील आणि राष्ट्रप्रेमी माणूस होते. 'क्रांतिवीर'पासून ते 'नटसम्राट'पर्यंत त्यांनी अभिनयाचा सुवर्णकाळ दिला. दुष्काळात शेतकर्‍यांच्या मदतीसाठी त्यांनी मकरंद अनासपुरे यांच्यासोबत 'नाम फाउंडेशन'ची स्थापना करून प्रत्यक्ष बांधावर जाऊन काम केले. 'जलयुक्त शिवार' मोहिमेतही त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांचा हा अचानक झालेला एक्झिट अत्यंत क्लेशदायक आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.



उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि खासदार रवी किशन यांच्याकडून शोक




उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नाना पाटेकर यांच्या सामाजिक भान आणि अभिनयाचा गौरव करत त्यांना आदरांजली वाहिली. तर, अभिनेते व खासदार रवी किशन यांनी, "नानाजी स्टारडमपासून मैलोन्मैल दूर राहून मातीशी जोडलेले कलाकार होते. त्यांच्या साधेपणातून आणि जीवनशैलीतून मी खूप काही शिकलो. हे माझे वैयक्तिक नुकसान आहे," अशा शब्दांत आपल्या भावना मांडल्या.



कलासृष्टी आणि क्रीडा जगतातून भावना




दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज, अभिनेत्री-खासदार कंगना रणौत आणि माजी क्रिकेटपटू शिखर धवन यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. प्रकाश राज यांनी नानांसोबत घालवलेले क्षण, संवाद आणि त्यांनी प्रेमाने बनवलेल्या जेवणाच्या आठवणींना उजाळा दिला. कंगना रणौतने नेहमी तंदुरुस्त दिसणाऱ्या नानाजींचे असे अचानक जाणे धक्कादायक असल्याचे म्हटले.



अखेरचे क्षण बालकांसोबत अन् देशसेवेची आठवण


निधनाच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी नाना पाटेकर गोव्यातील पणजी येथे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेथे त्यांनी लहान मुलांसोबत खेळत आणि वाद्य वाजवत आनंद साजरा केला होता. नाना पाटेकर यांच्या देशभक्तीची आठवण करून देताना, १९९९ मधील कारगिल युद्धादरम्यान त्यांनी अभिनयातून ब्रेक घेऊन थेट भारतीय सैन्यात सेवा बजावली होती, या ऐतिहासिक प्रसंगाचेही स्मरण आज केले जात आहे.

Comments
Add Comment

Nana Patekar passes away : नानांच्या जाण्याने सिनेसृष्टी हळहळली; बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांकडून श्रद्धांजली

Nana Patekar passes away :  हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का

Nana Patekar Passes Away : नाना पाटेकरांचा कारगिल युद्धातील 'तो' थरारक किस्सा! पडद्यावरच नाही, तर सीमेवरही नडलेला 'नटसम्राट'

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे केवळ त्यांच्या

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड; राजकीय वर्तुळातून शोक संदेश, मुख्यमंत्र्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळातही मोठा शोक व्यक्त

Revenue Staff Promotion : कोकण महसूल विभागात मोठा निर्णय: 39 कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती!

मुंबई : कोकण विभागातील महसूल विभागात कार्यरत असलेल्या 39 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. सहायक महसूल

Nana Patekar : 'आपला माणूस' हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Breaking : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास

मुंबई : आपल्या दमदार आवाजाने आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते नाना